Accident News Sangli: अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:22 IST2023-01-09T14:45:43+5:302023-01-09T19:22:26+5:30
अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत

Accident News Sangli: अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
गजानन पाटील
दरीबडची : करजगी (ता. जत) येथील विद्यार्थाचा करजगी-भिवर्गी रस्त्यावरील नरुटे वस्तीजवळ दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शिवकुमार साबू कटीमनी (वय १६) या असे या मृत विद्यार्थाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमरास घडली. या घटनेने करजगी गाव शोकाकुल झाले. अपघाताची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवकुमार हा चुलत बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरुन गेला होता. बहिणीला सोडून घरी येत असताना भिवर्गी हद्दीत नरुटे वस्तीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिवकुमारचा जागीच मृत्यू झाला. तो ज्ञानयोगी सिध्देश्वर महाराज कन्नड माध्यमिक शाळेत शिकत होता.
यावेळी परिसरातील नागरिकांनी गाडी नंबर ओळखून शिवकुमारच्या काकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून व मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास उमदी पोलिस करीत आहेत.