Sangli: अत्याचारित अल्पवयीन मुलीचा गरोदर काळात अकस्मात मृत्यू, अज्ञाताविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:43 IST2025-09-10T15:43:03+5:302025-09-10T15:43:35+5:30
सात महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गरोदर झाल्याची बाब यावेळी स्पष्ट झाली

संग्रहित छाया
तासगाव : तासगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. ८) ही तरुणी घरी असताना तिची प्रकृती अचानक बिघडली. ती बेशुद्ध झाली. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सांगलीत एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
सात महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गरोदर झाल्याची बाब यावेळी स्पष्ट झाली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.