शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

आबा गटाचे एका दगडात दोन पक्षी!

By admin | Updated: August 11, 2015 22:20 IST

संजयकाका-जयंत पाटील युतीला दणका : तासगावचे उट्टे अन् कवठेमहांकाळात ‘चमत्कार’

दत्ता पाटील - तासगाव -एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या बाबतीत एक म्हण प्रचलित आहे. मात्र त्याचे नेमके प्रत्यंतर तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा गटाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आणून दिले. तासगावात बाजार समितीच्या निवडणुकीत आबा-काका गटात झालेल्या मारहाणीचे उट्टे काढण्याचे काम आबा गटाने केलेच. त्याचबरोबर खासदार पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या युतीमुळे आबा गटाचे खच्चीकरण करण्याच्या खेळीला दणका देण्याचा ‘चमत्कार’ आबा गटाने करून दाखविल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीपासून खासदार संजय पाटील आणि आमदार आर. आर. पाटील यांच्यात टोकाचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर पाटील यांच्या निधनानंतर हा तणाव निवळल्यासारखी स्थिती निर्माण झाली असतानाच, पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाडापाडीच्या राजकारणाने, तर तासगाव बाजार समिती निवडणुकीत हाणामारीच्या राजकारणाने आबा व काका गटातील तणाव चव्हाट्यावर आला. हाणामारीच्या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या आबा गटाच्या स्वाभिमानी कार्यर्त्यांनी तर सरळ-सरळ जयंत पाटील आणि संजय पाटील यांच्या युतीला दणका देण्याचीच भूमिका घेतली. काहींनी उघडपणे आमदार पतंगराव कदमांशी संधान साधले, तर काहींनी अप्रत्यक्षपणे आमदार कदम यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पॅनेलच्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यावर कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा गटाने तालुक्यात भक्कम असतानादेखील जयंत पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार पाडण्याचा चमत्कार घडवून आणल्याचे दिसून येत आहे.एकूणच तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून भाजपशी सलगी करुन एक नवे वळण घेतले होते. आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे तयार होतील, अशी चर्चाही होत होती. मात्र तासगाव बाजार समिती निवडणुकीत आणि आता पाठोपाठ सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतील आबा गटाच्या भूमिकेने राजकारण पुन्हा जुन्याच वळणावर येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे. अर्थात यामागे कारणे अनेक असली तरी, सध्या तरी सोशल मीडियावर आबाप्रेमींच्या होणाऱ्या चर्चेतून आबांच्या शिलेदारांनी एका दगडात जिल्ह्याच्या राजकारणात नव्याने स्थिरावू पाहणाऱ्या दोन पक्षांना दणका दिल्याचे बोलले जात आहे.यासाठी काढले आबा गटाने उट्टे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात आबा गटाच्या उमेदवाराचा खासदार संजयकाका पाटील यांच्या खेळीने पराभव झाला. मात्र त्याची फारशी दखल पॅनेलचे नेतृत्व करणारे आणि मतदारसंघाचे पालकत्व असणाऱ्या आमदार जयंत पाटील यांनी घेतली नाही.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार गटाच्या कार्यकर्त्यांशी आबा गटाची धुमश्चक्री झाली. मात्र आमदार जयंत पाटील यांनी आबा गटातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा गांभीर्याने विचार न करता खासदार संजयकाकांशी असलेले सख्य कायम ठेवले.कवठेमहांकाळमध्ये आबा गटाची ताकद सर्वाधिक असतानादेखील निष्ठावंत आबा समर्थकांपैकी एकालाही आघाडीत उमेदवारी मिळाली नाही. याउलट खासदार गटाचे अस्तित्व नाममात्र असताना एक उमेदवारी त्यांच्या पदरात टाकली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनचा हा घटनाक्रम आबा समर्थकांच्या जिव्हारी लागणारा ठरला. त्यामुळेच कोणतीही ठरवून खेळी न करता कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तपणेच आमदार जयंत पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या युतीला दणका देण्याचे काम करून आबांच्या पश्चातही जिल्ह्याच्या राजकारणातील चुणूक दाखवून दिल्याची चर्चा होत आहे.