Sangli: नव्या दुचाकीची हौस बेतली जिवावर, नेलकरंजी फाट्याजवळ आटपाडीतील युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:33 IST2025-06-24T18:33:35+5:302025-06-24T18:33:35+5:30

आनंदाचे दु:खात रूपांतर

A youth from Atpadi died in an accident while carrying a new empty two wheeler from Sangli | Sangli: नव्या दुचाकीची हौस बेतली जिवावर, नेलकरंजी फाट्याजवळ आटपाडीतील युवक ठार

Sangli: नव्या दुचाकीची हौस बेतली जिवावर, नेलकरंजी फाट्याजवळ आटपाडीतील युवक ठार

आटपाडी : सांगलीहून नवी कोरी दुचाकी घेऊन उत्साहात आटपाडीकडे परतणाऱ्या युवकाचा अंत झाला. नेलकरंजी फाट्याजवळ भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मृत युवकाचे नाव अमित दशरथ राक्षे (वय २५, रा. साकाडी मळा, आटपाडी) असे असून, जखमी युवकाचे नाव विनायक बनसोडे (रा. आटपाडी) आहे. या प्रकरणी मृत युवकाचे वडील दशरथ राक्षे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री अमित राक्षे आणि त्याचा मित्र विनायक बनसोडे हे दोघे सांगली येथे आर-१५ क्र. एम. एच. १०-डी बी-५७०९ ही दुचाकी खरेदी करून आटपाडीकडे परतत होते. 

रात्री साडेअकराच्या सुमारास भिवघाट ओलांडून नेलकरंजी फाट्याजवळ आल्यानंतर भरधाव वेगातील दुचाकीवरील अमित याचे नियंत्रण सुटले. अचानक दुचाकी वळणावर सावरता न आल्यामुळे ती सरळ रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या बस स्टँडमध्ये जाऊन आदळली. दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला लागून अमितच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला विनायक बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आनंदाचे दु:खात रूपांतर

नवीन गाडी खरेदी करून आनंदाने घरी परतणाऱ्या अमित राक्षेच्या वाट्याला काळ आला. जी गाडी घेण्यासाठी तो हौसेने सांगलीला गेला होता, तीच गाडी त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. आनंदाच्या या प्रवासाचा शेवट इतका भयावह होईल, याचा कोणालाही अंदाज नव्हता. कुटुंबातील कष्टकरी युवकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साकाडी मळा परिसरात आणि आटपाडीच्या मार्केट यार्डातील सौदे बाजारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A youth from Atpadi died in an accident while carrying a new empty two wheeler from Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.