मोटारीची दुचाकीला धडक, दोघे ठार; त्रिमली-घाटमाथ्याजवळ दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:35 IST2023-12-19T13:34:47+5:302023-12-19T13:35:45+5:30
औंध : त्रिमली-घाटमाथा रोडवर छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी ...

मोटारीची दुचाकीला धडक, दोघे ठार; त्रिमली-घाटमाथ्याजवळ दुर्घटना
औंध : त्रिमली-घाटमाथा रोडवर छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.
सानिया रामचंद्र भोसले (वय २१, रा. खोतवाडी, ता. मिरज, जि. सांगली) व निखील उत्तम तिकुटे (वय २०, रा. माळशिरस) असे अपघातात ठार तरुण-तरुणीचे नाव आहे.
याबाबत औंध पोलिस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, त्रिमली (ता. खटाव) गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास पुसेसावळीकडून घाटमाथ्याकडे निघालेला छोटा हत्ती (एमएच ५०-७९३६) व घाटमाथ्याकडून पुसेसावळी-कडेगावकडे निघालेल्या दुचाकी (एमएच १० बीजे ५७३४) यांच्यात जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील सानिया भोसले व निखील तिकुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी छोटा हत्ती चालक सतीश मारुती भगत (रा. सातारा, मूळगाव पिंप्रद, ता. फलटण) याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अपघातातील तरुण-तरुणी कडेगाव येथे शिक्षण घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर व पोलिस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे करीत आहेत.