Sangli: तासगाव तालुक्यातील महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:14 IST2024-09-06T14:12:56+5:302024-09-06T14:14:04+5:30

तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिला जबरदस्तीने चारचाकी ...

A woman in Tasgaon taluka was raped and threatened to kill, a case was registered against both | Sangli: तासगाव तालुक्यातील महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा दाखल 

Sangli: तासगाव तालुक्यातील महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा दाखल 

तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून नेऊन मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे तिच्यावर अत्याचार केला. शिवाय येथून निघून गेल्यास जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विशाल दगडू मंडले (रा. नागेवाडी) याच्यासह चारचाकीचा चालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तासगाव तालुक्यातील एका महिलेला संशयित आरोपी विशाल मंडले याने जबरदस्तीने तिच्या घरासमोरून गाडीतून नेले. तिच्यावर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे बलात्कार केला. शिवाय तिचा पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच ''तू इथून निघून गेलीस तर तुझे तुकडे - तुकडे करीन'', अशीही धमकी दिली. 

याप्रकरणी संबंधित पीडित विवाहितेने विशाल मंडले याच्यासह अन्य एका विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी नागेवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.

Web Title: A woman in Tasgaon taluka was raped and threatened to kill, a case was registered against both