Sangli: पुणदीच्या गलाई व्यावसायिकाचा उत्तर प्रदेश येथील स्फोटात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:51 IST2025-06-13T18:50:18+5:302025-06-13T18:51:08+5:30

चार कामगारांचा उपचारादरम्यान अंत

A Galai businessman from Pundi in Sangli district died in an explosion in Uttar Pradesh | Sangli: पुणदीच्या गलाई व्यावसायिकाचा उत्तर प्रदेश येथील स्फोटात मृत्यू

Sangli: पुणदीच्या गलाई व्यावसायिकाचा उत्तर प्रदेश येथील स्फोटात मृत्यू

मांजर्डे : पुणदी (ता. तासगाव) येथील गलाई व्यावसायिक सुनील पाटील यांचे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे सराफ बजार या ठिकाणी सराफाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात गुरुवारी अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन सुनील पाटील व चार कामगार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणदी व परिसरात शोककळा पसरली आहे.

पुणदी (ता. तासगाव) येथील सुनील पाटील हे गलाई व्यावसायिक गेले वीस ते पंचवीस वर्षे झाली आग्रा येथे गलाईचा व्यवसाय करीत होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी व्यवसाय उभा केला होता. आग्रा येथे सराफ बाजारात त्यांचे चांदीच्या गलाईचे दुकान आहे. त्या दुकानामध्ये चांदीगाळणीचे काम चालते.

सुनील पाटील व त्यांच्यासोबत चार कामगार हे रोज सोने-चांदीचे काम करतात. गुरुवारी चांदीचे काम करत असताना तापमान वाढल्याने गॅस सिलिंडरच्या पाइपचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात सुनील पाटील व त्यांचे चार कामगार यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: A Galai businessman from Pundi in Sangli district died in an explosion in Uttar Pradesh