शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बापाने दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:46 IST

गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न, बहिणीची थरकाप उडवणारी साक्ष

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील बनपुरी (ता. आटपाडी) येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ करण्यात आल्याने दहा वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने पोटच्या दोन मुलींना अमानुष मारहाण करत जीव घेतला आहे. केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांचा निर्दयी छळ करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले.

मृतदेहाखालीच निर्धास्तपणे झोपले रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत ‘पाणी, पाणी’ म्हणून ओरडत होत्या. मात्र, त्यांच्याच आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना वरती बांधून निष्ठूर आई-वडील घरातच निर्धास्त झोपले होते, तर बाहेर आजी-आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता. तर आई-वडील पोटच्या मुलीच्या मृतदेहाखालीच निर्धास्तपणे झोपले होते.

आजोबांनी मुलींना खाली सोडले, मात्र..गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजता मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत सानिकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह घरी आणला.

गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्नही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी मयत सानिकाचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडील, आजी-आजोबा तसेच काही नातेवाइकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

अनुजाच्या जबाबाने भांडाफोडजखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार सांगितला. ‘आम्हाला वडिलांनी हात-पाय बांधून उलटे टांगले आणि मारहाण केली,’ असे तिने सांगितल्याने डॉक्टरांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.

आजोबांवर मुलाचा कोयत्याने जीवघेणा हल्लाया घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींना सोडणाऱ्या आजोबांवरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने हल्ला करत त्यांना धमकावले होते. यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि क्रौर्याची परिसीमा स्पष्ट होत आहे.

निर्दयी आई-बापाला कठोर शिक्षा द्यासध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर खून व खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. बनपुरीसारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला असून, ‘अशा निर्दयी लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’ अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Tortures Daughters: One Dead, Other Injured in Sangli

Web Summary : In Sangli, a father brutally tortured his two daughters, suspecting theft. He hung them upside down, leading to the death of one and severe injuries to the other. The community is outraged by this inhumane act.