शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
2
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
3
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
4
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
5
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
6
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
7
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
8
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
9
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
10
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
11
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
12
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
13
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
14
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
15
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
16
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
18
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
19
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
20
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका

शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, गडहिंग्लजमधील दाम्पत्याचा आटपाडीतील एकास सोळा लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 19:08 IST

आटपाडी : गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) येथील एका दाम्पत्याने पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथील एकास शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ...

आटपाडी : गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) येथील एका दाम्पत्याने पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथील एकास शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल सोळा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पतंगराव गोविंद कदम (वय ४२, रा. पिंपरी खुर्द, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी दोन्ही रा. झाडगल्ली, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी यांनी पतंगराव गोविंद कदम यांना गुंतवणूक रकमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. हिरा एम. डी. एम ट्रेड बोअर्स एलएलपी कंपनीमध्ये ५ ऑगस्ट २०२२ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत तब्बल २३ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांना परताव्याची रक्कम मिळाली. त्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत.अनेकवेळा मागणी करून पैसे न मिळाल्याने मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी यांनी १५ लाख ९७ हजार ८४३ रुपये रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे, अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करत आहेत.शेअर मार्केटचा आटपाडी पॅटर्नदरम्यान, आटपाडी तालुक्यात शेअर मार्केटच्या माध्यमातून शेकडो कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी पैसे गुंतवले होते. सुमारे दहा ते पंधरा टक्के परतावा देणारा शेअर मार्केटचा आटपाडी पॅटर्न त्यावेळी गाजला होता.मात्र, दोन वर्षांपूर्वी अचानक ट्रेडर्स घेणारे पळून गेल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले होते. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम अद्याप अनेकांना मिळालीच नाही. राजकीय नेते मंडळींनी मात्र रक्कम परत घेतल्या असून, सर्वसामान्य नागरिक मात्र यात बुडाले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस