शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:30 IST

मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना चपराक

सांगली : मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना एका सजग तरुणाने मतदानासाठीसांगली-विटा-सांगली असा १४० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करीत चपराक दिली आहे. ‘स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा तसेच लोकशाहीच्या उत्तम आरोग्यासाठी मतदान करा’ असा संदेश यानिमित्ताने दिला.सांगलीतील आर. जोशीज् बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख ऋषीन जोशी यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील घानवड. अकॅडमीच्या निमित्ताने गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सांगलीतच वास्तव्यास आहेत. असे असले तरी गावाशी असलेली नाळ त्यांनी जपली आहे. सांगलीत राहत असले तरी त्यांचे मतदान घानवड येथेच आहे.

आरोग्याबाबत सजग असणारे जोशी एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही निवडणुकीसाठी गावी मतदानाला जातातच. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही रविवारी ते मतदान करण्यासाठी जाणार होते. पण यादरम्यान थोडा वेगळा विचार करत त्यांनी थेट सायकलवरून मतदानासाठी जाण्याचा निर्णय घेतला.‘व्यायाम करा.. स्वतःला बळकट करा, मतदान करा... लोकशाही बळकट करा’. हा संदेश घेऊन त्यांनी सांगली-विटा-सांगली असा १४० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. सकाळीच ते सायकल घेऊन सांगलीतुन घानवडच्या दिशेने रवाना झाले. मतदानासाठी थेट सायकलवरुन गावात आलेल्या ऋषीन जोशी यांचे ग्रामस्थांनीही स्वागत केले. या उपक्रमाद्वारे जोशी यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदान