वारणा धरणात 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा, तुरळक पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:12 IST2019-06-28T12:45:54+5:302019-06-28T16:12:48+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

 7.95 TMC in Warna dam Water storage | वारणा धरणात 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा, तुरळक पावसाच्या सरी

वारणा धरणात 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा, तुरळक पावसाच्या सरी

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 7.95 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 11.32 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 1.90 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 1.78 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 1.87 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 1.60 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे.

अलमट्टी धरणात 21.62 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी

जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत तुरळक पाऊस झाला. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3, वाळवा-इस्लामपूर 0.5, तासगाव 0.2, शिराळा 4.5, कडेगाव 2.2, जत ,खानापूर-विटा, आटपाडी, कवठेमहांकाळ व पलूस - निरंक.




 

Web Title:  7.95 TMC in Warna dam Water storage