शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

वादळानं घरं उद्ध्वस्त... मदतीअभावी सांगली जिल्ह्यातील ७९४ कुटुंबं अद्याप उघड्यावर !

By अशोक डोंबाळे | Updated: May 11, 2026 18:20 IST

दोन वर्षांपासून भरपाई रखडली : ३२ लाखांचा निधी शासन दरबारीच अडकला

अशोक डोंबाळे

सांगली : जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने २०२४ मध्ये जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. कुणाच्या घरांची पत्रे उडाली, तर कुणाच्या भिंती कोसळल्या. नैसर्गिक आपत्तीने ७९४ कुटुंबांचे आयुष्य उघड्यावर आणले; मात्र जखमेवर फुंकर घालणारी शासनाची मदतही अद्याप मिळालेली नाही. दोन वर्षांपासून नागरिक शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत; पण मदतीचा ३२ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा निधी अद्याप शासन दरबारीच अडकून पडला आहे.

दि. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत मिरज, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यांत वादळी पावसाने मोठे नुकसान केले. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने ३२ लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणीही शासनाकडे केली; मात्र दोन वर्षे उलटूनही मदत मिळालेली नाही. शासनाकडून मदत मिळेल, या आशेवर अनेकांनी कर्ज काढून घरांची डागडुजी केली. आता मदत नाही आणि कर्जाचा बोजा मात्र वाढत चालला आहे. त्यामुळे आपत्तीच्या जखमेवर आर्थिक विवंचनेचे चटके बसत असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत.

आटपाडीतील शिवाजी माने म्हणाले, “घर पडल्यावर मदतीच्या आशेवर कर्ज काढून दुरुस्ती केली. पण दोन वर्षे झाली तरी शासनाकडून एक रुपयाची मदत मिळालेली नाही. आता कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे.”

लालफितीच्या कारभारात सामान्यांची फरपट

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ७९४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले; मात्र मदतीचा प्रस्ताव शासकीय लालफितीत अडकून पडला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर २०२५ आणि २०२६ मधील आपत्तीग्रस्तांना भरपाई मिळाली; पण २०२४ मधील लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मानसिक आणि आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

असे झाले होते नुकसान

नुकसानीचा प्रकार / कुटुंब संख्या / मागणी केलेले अनुदान
पक्की घरे / ६७ / ४,३५,५००
कच्ची घरे / ६०५ / २४,२०,०००
पशुधन गोठे / १२० / ३,६०,०००
झोपड्या / २ / १६,०००
एकूण / ७९४ / ३२,३१,५००

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

भरपाई मिळावी यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आमदार, खासदारांकडे तक्रारी केल्या. मात्र, दोन वर्षे उलटूनही कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त केली आहे. “निवडणुकीवेळी आश्वासने दिली जातात; पण संकटाच्या काळात कुणीही सोबत उभे राहत नाही,” अशी भावना लाभार्थ्यांमध्ये आहे.

“दोन वर्षांपासून कुटुंबांना मदत मिळाली नाही, ही गंभीर बाब आहे. कुणाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ७९४ कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली, याची चौकशी झाली पाहिजे. शासनाकडे लेखी तक्रार करून लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” - सत्यजित देशमुख, आमदार, शिराळा.

English
हिंदी सारांश
Web Title : Storm-hit Sangli families await aid; 794 still without shelter.

Web Summary : Hundreds of Sangli families, affected by storms in 2024, remain without promised government aid. Despite damage to homes, 794 families await ₹32.31 lakh in relief. Bureaucracy delays assistance, leaving citizens in debt and despair, with some families still awaiting compensation while others affected in later years already got compensated.