शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

गॅस पंप बंद झाल्याने ७ हजार रिक्षाचालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

सांगली : सांगली शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप अचानक बंद पडले असून एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ...

सांगली : सांगली शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप अचानक बंद पडले असून एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ७ हजार रिक्षाचालकांना त्यामुळे त्रास होत आहे. हे पंप प्रशासनाने ताब्यात घेऊन सुरू करावेत किंवा पोलीस आणि एसटी पंपावर गॅसची सोय करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी सांगितले.

काटकर म्हणाले, पेट्रोलचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा आधीच व्यवसाय कमी झाला आहे. मोठ्या प्रमाणावर रिक्षाचालक एलपीजी किट असणाऱ्या रिक्षा घेत आहेत. सांगली आणि मिरज शहर परिसरामध्ये पाच गॅस पंप सुरू झाल्यामुळे जवळपास सात हजार रिक्षाचालकांनी एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा खरेदी केल्या आहेत. मात्र, या पाचपैकी सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप चालकांनी अचानकच बंद केले आहेत. आणखी एका पंपावर अनियमित पुरवठा असतो. त्यामुळे जुना कुपवाड रोड आणि मिरज रोडवरील एका पंपावर रिक्षाचालकांच्या रांगा लागत आहेत. त्याठिकाणी ताटकळत रहावे लागत आहे. ७ हजार चालकांच्या मागणीला हे दोन पंप पुरेसे नाहीत. त्यामुळे गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा मध्येच बंद पडत आहेत. सांगली आणि मिरज एसटी डेपोमध्ये तसेच पोलीस मुख्यालयात शासकीय पंपावर प्रशासनाने रिक्षाचालकांना गॅसची उपलब्धता करून दिली तर या दोन्ही शहरातील रिक्षाचालकांची चिंता कायमची मिटणार आहे. शिवाय त्याचा फायदा सरकारी पंपानाही होईल. दोन्ही शहरातील सात हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालकांचा असणारा हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटणार असून यावेळी रिक्षाचालकांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन गर्दी न करता निवडक रिक्षाचालकांनी शिष्टमंडळात भेटायला यावे असे आवाहन काटकर यांनी केले आहे.