शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्यास पाच कोटींचा फटका

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

संकरित बीटी कॉटन वाण अद्याप भुईवरच : ३५० हेक्टरवरील लागवड वाया

अविनाश बाड - आटपाडी -आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पांढऱ्या सोन्याने डोळे पांढरे करण्याची वेळ आणली आहे. सुमारे ३५० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर उन्हाळ्यात थेंबन् थेंब पाण्याचा उपयोग करून लागवड केलेल्या संकरित कापसाच्या बीटी कॉटन वाणाने तीन महिने झाले तरी, भुई सोडलेली नाही. फुले, बोंडे न लागल्याने या भागातील शेतकऱ्यांना सुमारे पाच कोटींचा फटका बसला आहे. आटपाडी तालुक्यात डाळिंबानंतर उन्हाळ्यात कापूस हेच शेतकऱ्यांसाठी नगदी पीक वरदान ठरलेले असताना यंदा तालुक्यावर पर्जन्यराजाने थोडी कृपा केली. मात्र पांढऱ्या सोन्याने घोर निराशा केली आहे. तालुक्यात वरलक्ष्मी आणि येलार ही वाणे आतापर्यंत शेतकरी वापरत होते. मात्र रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाला या जाती बळी पडत असल्याने शेतकरी कीडनाशके फवारून मेटाकुटीला येत होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव न होणारी वाणे विकसित झाल्याने यंदा बीटी या वाणाची शेतकऱ्यांनी सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात लागवड केली आहे. तीन महिन्यानंतर म्हणजे आता त्यांची पूर्ण वाढ होऊन प्रत्येक कापसाच्या झाडाला किमान १५० ते २५० फुले यायला हवी होती. आता प्रत्यक्षात काही झाडांना २-४, तर छोट्यांना काहीच फुले लागली नाहीत. शेतकऱ्यांना हे नगदी पीक असल्याने पेरणीपूर्व मशागत, बियाणे, शेणखत, रसायनिक खते, खुरपणी असा एकरी १० ते १५ हजार रूपये खर्च केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून चांगला कापूस आणि उत्पादन येण्यासाठी कापसाची लागवड केली आहे. पण शेतकऱ्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅनिकचीही फवारणी केली आहे. पण त्याचा रोपांच्या वाढीसाठी कसलाही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन प्रसंगी व्याजाने पैसे काढून कापसासाठी घातलेले पैसेही आता एकाही शेतकऱ्याला कापसातून निघणार नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. सूर्याची अवकृपा की बोगस बियाणे?हे बियाणे चांगले उगवून आले. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेबद्दल शंका घ्यायला वाव नाही. मात्र उगवणीनंतर सुमारे तीन आठवड्यापर्यंतच या कापसाच्या झाडांची वाढ झाली. त्यानंतर वाढ खुंटली. काही झाडे एकदम छोटी सहा इंचापर्यंत, तर काही फू ट-दीड फुटापर्यंत अशी असमान वाढली. यंदा एप्रिल मे, महिन्यात आटपाडी तालुक्यातील तापमान जास्त राहिले. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून चांगला कापूस आणि उत्पादन येण्यासाठी कापसाची लागवड केली आहे. पण शेतकऱ्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी अखेरचा उपाय म्हणून टॅनिकचीही फवारणी केली आहे. पण त्याचाही रोपांच्या वाढीसाठी कोणताही उपयोग झालेला नाही. आता जादा तापमानामुळे कापसाची वाढ झाली नाही आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे फुले, बोंडे आली नाहीत, का कापसाचे बियाणेच बोगस आहे, याची कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून चौकशी होण्याची गरज आहे.