पश्चिम भागातील ४८ गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:17+5:302021-02-05T07:28:17+5:30

इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील येत्या पंचवीस वर्षातील लोकसंख्यावाढ विचारात घेऊन ‘जल जीवन मिशन’ ...

48 villages in western region will be self-sufficient in water | पश्चिम भागातील ४८ गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणार

पश्चिम भागातील ४८ गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणार

इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील येत्या पंचवीस वर्षातील लोकसंख्यावाढ विचारात घेऊन ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी देण्याबाबतचे आराखडे तयार करावेत, अशी सूचना आ. मानसिंगराव नाईक यांनी केली.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘जल जीवन मिशन’ योजनेबाबत बैठक झाली. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याच्या सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

आ. नाईक म्हणाले, जल जीवन मिशन हे प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याबाबत सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे. यामध्ये बंद पडलेल्या, रखडलेल्या, पाण्याची कमतरता असलेल्या किंवा नव्याने मागणी असलेल्या योजना पूर्ण करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यापासून गावे स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आगामी पंचवीस वर्षातील अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पाणी योजनांचे आराखडे तयार करावे. या कामात कोणीही हायगय करू नये.

सहायक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सदस्य शंकरराव चव्हाण, बाजार समितीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, शाखा अभियंता राजेंद्र कांबळे उपस्थित होते. शाखा अभियंता प्रवीण तेली यांनी आभार मानले.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर पाणी न्यूज

इस्लामपूर (ता.वाळवा) येथील पंचायत समितीमध्ये झालेल्या ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या बैठकीत आ. मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवराज पाटील, शुभांगी पाटील, नेताजी पाटील, शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार उपस्थित होते.

Web Title: 48 villages in western region will be self-sufficient in water