महापालिकेकडे आठ महिन्यांत ४६० विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:12+5:302021-09-25T04:27:12+5:30

सांगली : महापालिकेकडे गेल्या आठ महिन्यांत ४६० विवाहांची नोंद झाली. सर्वाधिक विवाह नोंदणी सांगली कार्यालयात झाली आहे. नवदाम्पत्यांनी विवाहाची ...

460 marriages registered with NMC in eight months | महापालिकेकडे आठ महिन्यांत ४६० विवाह नोंदणी

महापालिकेकडे आठ महिन्यांत ४६० विवाह नोंदणी

सांगली : महापालिकेकडे गेल्या आठ महिन्यांत ४६० विवाहांची नोंद झाली. सर्वाधिक विवाह नोंदणी सांगली कार्यालयात झाली आहे. नवदाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यापूर्वी नवदाम्पत्य, साक्षीदार, भटजी यांच्यासह त्यांना कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत होती. आता नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करून अपाॅइंटमेंट घेता येत असल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या आठ महिन्यांत ४६० जणांनी विवाह नोंदणी केली आहे. यात सांगलीतील प्रभाग १ आणि २ च्या कार्यालयात २७८, कुपवाडमध्ये ७२ आणि मिरजेमध्ये ११० विवाहांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या सर्वच कार्यालयांत सुलभतेने आणि कमीत कमी वेळेत विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात आहे. नवदाम्पत्यांनी त्याचा लाभ घेऊन विवाहाची नोंद महापालिकेकडे करावी, तसेच प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.

Web Title: 460 marriages registered with NMC in eight months