शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ४०० कोटींची मागणी

By admin | Updated: November 17, 2016 23:27 IST

दररोज ५० कोटींच्या जुन्या नोटा जमा : शहरातील बँका, पोस्टासमोरील गर्दी ओसरू लागली

सांगली : केंद्र सरकारच्या नोटा बंदच्या निर्णयाला दहा दिवसांचा कालावधी होऊनही, बहुतांशी एटीएम यंत्रणा कोलमडली असून, बॅँकांबाहेरील गर्दीही कायम आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदमुळे चलन तुटवड्याची निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्याला ४०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. पेट्रोलपंप, रुग्णालय यासह अत्यावश्यक सेवेसाठी जुन्या चलनास मुदतवाढ देण्यात आल्याने शहरातील बॅँका व पोस्टाबाहेरील गर्दी आता ओसरू लागली आहे. दरम्यान, चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजार रूपयांच्या ५० कोटी रूपयांच्या नोटा दररोज संकलित होत आहेत. त्याबदल्यात पुरवठा होणारी रक्कम खूप कमी आहे. त्यात नवीन पाचशेची नोट अजूनही सांगलीत उपलब्ध झालेली नाही. (प्रतिनिधी) ग्राहकांचे सहकार्य हवे... नागरिकांनी कोणत्याही अफ वेवर विश्वास न ठेवता, भीती न बाळगता गरजेएवढीच रक्कम बाळगावी. शक्य तिथे आॅनलाईन पेमेंट, डेबिट कार्ड सेवेचा वापर करावा. बॅँक कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बॅँक कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी यांनी केले आहे. रात्रीचा दिवस बॅँकेबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आणि चलनाचा कमी पुरवठा असतानाही, ग्राहकांना सेवा देण्यासाठी बॅँक कर्मचारी जादा वेळ काम करत आहेत. गुरूवारपासून रात्री बारापर्यंत कर्मचारी बॅँकेतच थांबून काम करत असल्याने, चलन तुटवड्याची परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होत आहे. बँक अधिकाऱ्यांना मिळाले रात्री एक वाजता जेवण गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच बॅँकांतील कर्मचारी, अधिकारी रात्री उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करत आहेत. मंगळवारी शहरातील एका बॅँकेतील परप्रांतीय अधिकाऱ्यांचे रात्री एकपर्यंत काम सुरू होते. एवढ्या रात्री त्यांना जेवण मिळणे अशक्यच होते. तरीही एका हॉटेलमध्ये चौकशी केल्यानंतर, तेथील चालकाने, ‘हॉटेल बंद झाले आहे, तरीही तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत आमच्यासाठी काम करत आहात, तर जेवण देणे माझे कर्तव्य बनते’, असे म्हणत या अधिकाऱ्यांना जेवण तयार करून दिले. विशेष म्हणजे त्यानंतर त्या हॉटेल चालकाने या अधिकाऱ्यांचे बिलही घेतले नाही.