Sangli: काळ्याबाजारात विक्रीला जाणारा रेशनिंगचा ३३ टन तांदूळ पकडला, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:26 IST2025-11-27T18:25:35+5:302025-11-27T18:26:17+5:30
लवंगाजवळ उमदी पोलिसांची कारवाई

Sangli: काळ्याबाजारात विक्रीला जाणारा रेशनिंगचा ३३ टन तांदूळ पकडला, दोघांवर गुन्हा दाखल
दरीबडची : लवंगा (ता. जत) गावाजवळ उमदी पोलिसांनी विजापूर-अहिल्यानगर महामार्गावर सापळा रचून काळ्याबाजारात विक्रीला जाणारा ३३ टन ४०० किलो तांदूळ पकडला. उमदी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत ३५ लाख ३ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे यांच्या फिर्यादीवरून ड्रायव्हर तिपन्ना हेबालेवा मदार (वय - ३९) यलाप्पा बालाप्पा देसाई (दोघे रा. चन्नापूर ता. रामदुर्ग जि. बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विजापूर महामार्गावर ट्रक क्रमांक '' केए ३६ सी ५८५२ मधून अवैद्यरीत्या रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर उमदी पोलिसांनी लवंगा गावाजवळ ट्रक पकडून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये ७७३ गोणीमध्ये ३३ टन ४०० किलो तांदूळ आढळून आला. याबाबत जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे यांनी तपासणी केली असता पडकलेला रेशनिंगचा तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३३,४४० किलो वजनाचा तांदूळ मुद्देमाल जप्त केला. एकूण १० लाख ३ हजार २०० रुपयांचा तांदूळ तसेच २५ लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत.