सांगली : जिल्हा परिषदेतील ६१ गटांपैकी २५ गटांत काँग्रेसने उमेदवार उभा केले आहेत. तसेच पंचायत समितीच्या १२२ गणांपैकी केवळ ४९ गणांमध्ये उमेदवार उभा केले आहेत. काँग्रेसने उर्वरित जागा राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यासह मित्र पक्षांना सोडल्या आहेत. शिराळा आणि आटपाडी तालुक्यांत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नाही.जिल्हा परिषद ६१ गट आणि १२२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे २५ गट आणि ४९ पंचायत समितीचे गण लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पलूस, कडेगाव तालुक्यांतील सर्व गट आणि गण लढविण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. जत तालुक्यातील सहा गट आणि १४ गण, मिरज तालुक्यातील सात गट आणि १२ गण, कवठेमहांकाळ, वाळवा, खानापूर, तासगाव तालुक्यांतील प्रत्येकी एक गट लढविणार आहेत. कवठेमहांकाळमध्ये पंचायत समितीचे ३, वाळवा २ आणि खानापूर २ गणांची निवड लढवत आहेत.मोहनराव कदम यांचे तीन नातू रिंगणातमोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम हे हिंगणगाव बु. (ता. कडेगाव) तर दिग्विजय कदम हे चिंचणी (ता. कडेगाव) पंचायत समिती गणातून रिंगणात उतरले आहेत. कुंडल जिल्हा परिषद गटातून डॉ. पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड निवडणूक मैदानात उतरले आहेत.
काँग्रेसचे जिल्हा परिषद गट लढविणारे उमेदवारउमेदवार / गट
- दिनकर पाटील / भोसे (ता. मिरज)
- प्राजक्ता चौगुले / आरग (ता. मिरज)
- अक्षदा सूर्यवंशी / बेडग (ता. मिरज)
- प्रेरणा पोळ / कवलापूर (ता. मिरज)
- पूजा एडके / बुधगाव (ता. मिरज)
- प्रशांत अवधूत / कसबे डिग्रज (ता. मिरज)
- दस्तगीर कासीम मुजावर / समडोळी (ता. मिरज)
- विठ्ठल सातपुते / उमदी (ता. जत)
- रमेश पाटील / मुचंडी (ता. जत)
- रवींद्र सावंत / बनाळी (ता. जत)
- परशुराम सांगोलकर / शेगाव (ता. जत)
- काजल दुधाळ / डफाळापूर (ता. जत)
- सुजाता चौखंडे-माळी / बिळूर (ता. जत)
- ऋषिकेश लाड / कुंडल (ता. पलूस)
- वर्षा जाधव / दुधोंडी (ता. पलूस)
- सुदीप गडदे /अंकलखोप (ता. पलूस)
- प्रतीक पाटील / भिलवडी (ता. पलूस)
- वैशाली मुळीक / तडसर (ता. कडेगाव)
- विद्या कुंभार / कडेपूर (ता. कडेगाव)
- प्रियांका महाडिक / वांगी (ता. कडेगाव)
- आशा गावडे / देवराष्ट्रे (ता. कडेगाव)
- अजित बनसोडे / रांजणी (ता. कवठेमहांकाळ)
- जयश्री पाटील / बोरगाव (ता. वाळवा)
- अमित पाटील / येळावी (ता. तासगाव)
- संभाजी धनवडे / भाळवणी (ता. खानापूर)
पंचायत समिती गण लढविणारे उमेदवारउमेदवार / पंचायत समिती गण
- गजानन माळी / सोनी (ता. मिरज)
- महावीर बस्तवडे / भोसे (ता. मिरज)
- वीणाताई पाटील / खटाव (ता. मिरज)
- अण्णासो कवाळे / आरग (ता. मिरज)
- तन्वी कमलेकर / नरवाड (ता. मिरज)
- संभाजी पाटील / बेडग (ता. मिरज)
- विजय पाटील / बामणोली (ता. मिरज)
- जयश्री खाडे / कवलापूर (ता. मिरज)
- शोभा मोहिते / समडोळी (ता. मिरज)
- सूरज मगदूम / इनामधामनी (ता. मिरज)
- मंजूषा घाडगे / माधवनगर (ता. मिरज)
- अनिल डुबल / बुधगाव (ता. मिरज)
- शालनबाई कोरे / माडग्याळ (ता. जत)
- संगीता सावंत / उमदी (ता. जत)
- राघवेंद्र होनमोरे / करजगी (ता. जत)
- लक्ष्मण चव्हाण / दरीबडची (ता. जत)
- अश्विनी मोरे / मुचंडी (ता. जत)
- भाग्यश्री पवार / खोजनवाडी (ता. जत)
- प्रमोद सावंत / बनाळी (ता. जत)
- मधुकर नरळे / येळवी (ता. जत)
- साहेबराव शिंदे / शेगाव (ता. जत)
- दीपाली चव्हाण / कोसारी (ता. जत)
- बाबासाहेब माळी / डफळापूर (ता. जत)
- सारिका गडदे / बाज (ता. जत)
- बापीरज घेज्जी / बिळूर (ता. जत)
- श्रीदेवी कट्टीमनी / उमराणी (ता. जत)
- हेमलता पवार / कुंडल (ता. पलूस)
- सुवर्णा संकपाळ / बांबवडे (ता. पलूस)
- प्रशांत नलवडे / रामनंदनगर (ता. पलूस)
- जगन्नाथ मोटे / दुधोंडी (ता. पलूस)
- वैभव उगळे / आमणापूर (ता. पलूस)
- जितेश बनसोडे / अंकलखोप (ता. पलूस)
- हजराबी सलामत / भिलवडी (ता. पलूस)
- शोभा हजारे / वसगडे (ता. पलूस)
- रणजित पवार / तडसर (ता. कडेगाव)
- सुप्रिया करांडे / शाळगाव (ता. कडेगाव)
- डॉ. जितेश कदम / हिंगणगाव बु. (ता. कडेगाव)
- सुवर्णा रूपनूर / कडेपूर (ता. कडेगाव)
- डॉ. विजय महाडिक / नेवरी (ता. कडेगाव)
- राजकुंवर सूर्यवंशी / वांगी (ता. कडेगाव)
- भारती मिसाळ / देवराष्ट्रे (ता. कडेगाव)
- दिग्विजय कदम / चिंचणी (ता. कडेगाव)
- रावसाहेब शिंदे / नागज (ता. कवठेमहांकाळ)
- अविराजे शिंदे / मळणगाव (ता. कवठेमहांकाळ)
- दिगंबर लोंढे / हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ)
- यदुराज थोरात / बोरगाव (ता. वाळवा)
- प्रियांका सावंत / ताकारी (ता. वाळवा)
- लालासो हरुगडे / आळसंद (ता. खानापूर)
- चंद्रकांत चव्हाण / भाळवणी (ता. खानापूर)
Web Summary : Congress will contest 25 ZP and 49 Panchayat Samiti seats in Sangli, allotting remaining seats to allies. Candidates declared, including Mohanrao Kadam's grandsons and Patangrao Kadam's grandson, Rishikesh Lad. Shirala and Atpadi have no Congress candidates.
Web Summary : सांगली में कांग्रेस 25 जिला परिषद और 49 पंचायत समिति सीटों पर चुनाव लड़ेगी, बाकी सीटें सहयोगियों को आवंटित की जाएंगी। मोहनराव कदम के पोते और पतंगराव कदम के पोते, ऋषिकेश लाड सहित उम्मीदवारों की घोषणा। शिरला और आटपाडी में कांग्रेस का कोई उम्मीदवार नहीं है।