जिल्ह्यात १५ नवे रुग्ण; १५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:20+5:302021-02-05T07:21:20+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १५ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११९ ...

15 new patients in the district; 15 corona free | जिल्ह्यात १५ नवे रुग्ण; १५ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १५ नवे रुग्ण; १५ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १५ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११९ रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तासगाव तालुक्यातील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत ३, तर मिरजेत २ रुग्णांची नोंद झाली. मिरज व आटपाडी तालुक्यांत प्रत्येकी एक, जत तालुक्यात चार, तर कडेगाव व तासगाव तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले. खानापूर, पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ व वाळवा या पाच तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात तासगाव तालुक्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या २१० चाचण्या करण्यात आल्या, त्यात ९ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ६५४ चाचण्यांत ६ रुग्ण सापडले. सध्या ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३३, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर २, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत.

Web Title: 15 new patients in the district; 15 corona free