शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून १३११ हरकती; लढ्याचे केंद्र कवलापूर

By संतोष भिसे | Published: March 29, 2024 5:29 PM

महामार्गबाधितांचा कवलापुरात मेळावा

बुधगाव : नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्गाविरोधातसांगली जिल्ह्यातून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे २५० अशा एकूण १३११ हरकती २८ मार्चअखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गबाधितशेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले. महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कवलापूर (ता. मिरज) येथे झाला. यावेळी समितीचे कांबळे म्हणाले, या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरु करणे अनाकलनीय आहे. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील.कांबळे म्हणाले, हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकऱ्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सामाजिक सलोखाही तुटणार आहे. या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होणार आहेत. त्यामुळे तो रद्द करावा.दरम्यान, सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनशाम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी आभार मानले.

संघर्षाचा केंद्रबिंदू कवलापूरशक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कवलापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कवलापूर येथेच राहील असा निर्णय झाला. घनशाम नलावडे (सांगली), सागर बिले (सोलापूर), दिलीप खोत (कोल्हापूर) यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी