शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतून राष्ट्रपतींना ११०० पत्रे

By admin | Updated: August 20, 2015 22:50 IST

अंनिसची मोहीम : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार, अशा मागणीची सुमारे अकराशे पत्रे सांगलीकरांनी लिहून ती राष्ट्रपतींना पोस्टाद्वारे पाठविली आहेत. अंनिसच्यावतीने बसस्थानकानजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी दिवसभर ही मोहीम सुरू होती.दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. मारेकऱ्यांना कधी पकडणार, अशी मागणी राष्ट्रपतींकडे लेखी पत्राद्वारे करणार असल्याचे अंनिसने जाहीर केले होते. त्यास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पत्र लिहिताना लोकांच्या मनातील असंतोष व्यक्त झाला. भर दिवसा दाभोलकरांची हत्या झाली असताना, पोलिसांना मारेकरी कसे सापडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अकराशे पत्रे दिवसभरात लिहून पोस्टाने पाठविण्यात आली. सायंकाळी सांगली पोस्ट कार्यालयातील पत्रे संपल्याने ही मोहीम थांबविण्यात आली. प. रा. आर्डे, सुहास यरोडकर, चंद्रकांत वंजाळे, विकास मगदूम, अ‍ॅड. अमित शिंदे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)