शिराळा : धामवडे (ता. शिराळा) येथे सोमवारी (दि. ७) रात्री १२ वाजता ग्रामस्थांना ९ ते १० फुटी मगर रस्त्यावर फिरताना आढळली. या मगरीला रेस्कु करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या प्रकारामुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.शिरशी धामवडे रस्त्यावर मस्कर यांच्या वस्तीजवळ कोंडाईवडी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील यांच्या निदर्शनास ही मगर आली. त्यांनी भाटवडे गावचे प्राणी मित्र गणेश निकम, प्रशांत देवकर यांना फोन करून माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे , वनरक्षक दत्तात्रय शिंदे, संतोष कदम, गणेश निकम, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला जेरबंद केले. यानंतर मगरीला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
Sangli: धामवडे येथे १० फूट लांबीची मगर जेरबंद, वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:28 IST