सांगली मार्केट यार्डातील १० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:30+5:302021-04-11T04:26:30+5:30

सांगली : कोरोनाचा प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून शनिवारी सांगली मार्केट यार्डातील सौद्यासह सर्वच दुकानांतील व्यवहार शंभर टक्के ...

10 crore transactions at Sangli Market Yard stalled | सांगली मार्केट यार्डातील १० कोटींचे व्यवहार ठप्प

सांगली मार्केट यार्डातील १० कोटींचे व्यवहार ठप्प

सांगली : कोरोनाचा प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून शनिवारी सांगली मार्केट यार्डातील सौद्यासह सर्वच दुकानांतील व्यवहार शंभर टक्के बंद होते. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला असून, सुमारे १० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला मात्र व्यापाऱ्यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे. व्यापारी आणि अडत्यांनी सौदे बंद ठेवले होते. मार्केट यार्डात हळद, गूळ, बेदाणा आदी शेतीमालाचे सौदे काढण्यात येतात. यासाठी बाहेरून व्यापारी, शेतकरी येत आहेत. बाहेरुन येणाऱ्यांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी सर्व शेतीमालाचे सौदे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. मार्केट यार्डमधील उलाढालीवर सुमारे १० कोटींचा परिणाम झाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 10 crore transactions at Sangli Market Yard stalled