राजारामबापूकडून मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना १ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:47+5:302021-09-25T04:27:47+5:30

इस्लामपूर : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेतील अपघाती निधन झालेले कर्मचारी सारंग संजय पाटील यांच्या कुटुंबीयांना कारखान्यामार्फत १ ...

1 lakh assistance from Rajarambapu to the heirs of the deceased employee | राजारामबापूकडून मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना १ लाखाची मदत

राजारामबापूकडून मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना १ लाखाची मदत

इस्लामपूर : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेतील अपघाती निधन झालेले कर्मचारी सारंग संजय पाटील यांच्या कुटुंबीयांना कारखान्यामार्फत १ लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. वाटेगाव-सुरुल शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयावर ओढविलेल्या प्रसंगात कुटुंबास मदतीचा हात देण्यासाठी ७५ हजार रुपये जमा केले आहेत. ते लवकरच त्यांच्या कुटुंबीयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.

राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते एक लाख रुपये मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयाकडे देण्यात आला. स्व. सारंग पाटील यांच्या पत्नी सायली पाटील, वडील संजय पाटील यांनी हा धनादेश स्वीकारला. या वेळी मुख्य अभियंता संताजी चव्हाण, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, सुरुलच्या सरपंच कुंदाताई पाटील, माजी सरपंच संदेश पाटील, बंडा नांगरे, संजय बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Web Title: 1 lakh assistance from Rajarambapu to the heirs of the deceased employee