The brutal murder of an old man who went to keep cattle! | गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून !

गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून !

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून !देवगड तालुक्यातील दहीबाव येथील घटना

देवगड : देवगड तालुक्यातील दहिबाव आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन फटू कदम ( ६० रा . दहीबाव आयतनवाडी ) याचा मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला.त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केलेले असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

मोहन कदम हे सोमवारी दुपारीगुरे राखण्यासाठी माळरानावर गेले होते.या घटनेची महिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , दहीबाव आयतनवाडीयेथील मोहन कदम हे सोमवारी दुपारी १.३० वा . सुमारास घरात जेवण झाल्यानंतर गुरे राखण्यासाठी देवगड - मालवण महामार्गावर दहीबाव आयतन पन्हळ या ठिकाणी गेले होते . सायंकाळी उशिरापर्यंत ते घरीआले नाहीत . म्हणून त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र ते आढळून आले नाहीत .

सकाळी शोधघेत असताना आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन कदम यांचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला . त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वर केल्याचे दिसून आले.याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ देवगड पोलिसांना कळविले .

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले .

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर शरीरावर असलेल्या वार व जखमा यामुळे खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मात्र खून कोणी केला व कशासाठी याची माहिती अद्याप मिळालेली नाही. देवगड पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

Web Title: The brutal murder of an old man who went to keep cattle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.