PHOTOS: चहलच्या पत्नीचा इतर व्यक्तीसोबत रोमान्स? नेटकऱ्यांनी लावला तर्क, जाणून घ्या सत्य

Surbhi Chandana And Dhanashree Verma: अभिनेत्री सुरभी हुबेहुब धनश्री वर्मासारखी दिसते.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही हुबेहुब अभिनेत्री सुरभी चंदनासारखी दिसते. धनश्री आणि सुरभी यांच्या चेहऱ्यात बरेच काही साम्य असल्याने चाहत्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

आता सुरभीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पतीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. ती तिचा पती करण शर्मासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.

मात्र, चाहत्यांनी भलताच तर्क लावत चहलची पत्नी धनश्रीला लक्ष्य केले. धनश्री वर्मा इतर व्यक्तीसोबत असल्याचे चाहत्यांनी म्हटले.

नेटकरी सुरभीला धनश्री समजून आक्षेपार्ह कमेंट्स करत आहेत. काही लोकांना युझी चहलला टॅग करून त्याची खिल्ली उडवली.

सुरभीने पती करणसोबत एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेकांनी धनश्री धोखेबाज आहे, तिने चहलला फसवले अशा प्रतिक्रिया दिल्या. अशातच काहींनी धनश्री आणि सुरभी यांच्यातील फरक समजावून सांगितला.

भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते.

चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री आणि सुरभी यांच्या चेहऱ्यात साम्य असल्याने अनेकांचा गोंधळ उडतो.

धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.

आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नृत्यकला शिकताना या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.