(Image Credit : USA Today)
पती-पत्नीच्या नात्याबाबत वेगवेगळ्या मान्यता आणि वेगवेगळ्या धारणा आहेत. पण हळूहळू यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. खाजगी आणि सामाजिक समजल्या जाणाऱ्या या मुद्यावर आता काही अभ्यासकांनी रिसर्चही केले आहे. नात्यांचा हा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही शोध करण्यात आले आहेत.
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, पुरुषांनी पैशांबाबत नेहमी पुढाकार घ्यायला हवा. म्हणजे डेटला गेले असाल तर बिल त्यांनीच द्यावं, पण चॅम्प मॅन यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, पुरुषांना ही बाबा आता अजिबात पसंत नाही. कारण त्यांना आता असं वाटतं की, महिलांनीही पैसे खर्च करणे सुरु करावे.
जर तुम्ही पैशांबाबत काही बोलण्यावर अडखळत असाल किंवा फार ओवर अॅक्टिव होत असाल तर सांभाळून रहा. कारण कानसस स्टोटे यूनिव्हर्सिटीमधील अभ्यासिका सोनया ब्रिट यांचं म्हणणं आहे की, पैशांवरुन सुरु झालेला वाद कधी कधी घटस्फोटापर्यंत पोहोचतो.
हे मुद्दे महत्त्वाचे
असे मानले जाते की, पुरुष शारीरिक संबंधाबाबत जास्त उत्साही असतात आणि ते सतत याबाबतच विचार करत असतात. ड्यूक यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार ही बाब समोर आली की, पुरुष आणि महिला दोघेही शारीरिक संबंधाबाबत विचार करतात. पण महिला याबाबत खुलेपणाने बोलणे पसंत करत नाहीत.
एरोजोना यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांचं मत आहे की, पती-पत्नी यांच्यातील भावनात्मक वाद पुरुष नेहमीच संपवण्याचा प्रयत्न करतात. पण महिला त्या विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तो विषय त्यांना तिथेच सोडता येत नाही.
दुराव्यालाही महत्त्व
लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिपबाबत तुम्ही ऐकलं असेलच आणि असे मानले जाते की, या नात्यांचं आयुष्य कमी असतं. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, अशी नाती जास्त काळ टिकतात आणि त्यांच्यात प्रेमही कायम राहतं.
जर तुम्ही असा विचार करत असाल की, हृदयाची नाती केवळ प्रेमाने तयार होतात, व्यक्तीच्या चेहऱ्याने नाही. तर तुम्हाला तुमचा विचार बदलायला हवा. ब्रिटीश जनरलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, पुरुष आकर्षक दिसणाऱ्या आणि स्मार्ट महिलांना पसंत तर करतातच, पण लग्नाचा विषय निघाल्यावर पत्नी कमी सुंदर असली तरी त्यांना चालणार असतं.
जास्तीत जास्त पती-पत्नी सोबत राहणे, खाणे आणि झोपणे ही थेअरी फॉलो करतात. पण केवळ असं करु नका. टोरांटोत करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ३० ते ४० टक्के जोडपी वेगवेगळ्या बेडवर झोपणे पसंत करतात. असे केल्याने त्यांनी एनर्जी कायम राहते आणि नातं ओझं होण्यापासून रोखलं जातं.
घटस्फोटानंतर मिळतो आनंद
लंडनच्या किंगस्टन यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका रिपोर्टनुसार, घटस्फोट घेतल्याच्या ५ वर्षांनंतर पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त खूश राहतात. अनेकदा आढळलं आहे की, आर्थिक रुपाने कमजोर असलेली महिला देखील लग्न तुटल्यानंतरही आनंदाने जीवन जगतात. तज्ज्ञांनी याचं कारण सांगितलं की, त्या घटस्फोटानंतर मोकळेपणाने जगायला लागतात.