मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 02:43 PM2020-02-19T14:43:07+5:302020-02-19T14:45:44+5:30

उंचीच्या मुली जास्त उंची असलेल्या मुलींच्या तुलनेत जास्त फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे मुलं  पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी हग करू शकतात.

Why do boys like to hug girls with shirt girls | मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं

मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं

googlenewsNext

मुलगा असो किंवा मुलगी चांगली उंची असेल तर तुमचं व्यक्तीमत्व चांगलं दिसत असतं. अनेकदा असं वाटत असतं की आपला होणारा पार्टनर मस्त टॉल असावा. पण ज्यावेळी मिठी मारण्याची वेळ येते. तेव्हा अनेक मुलांना कमी हाईट असलेल्या मुली आवडत असतात.  जरी कोणीही खुलेपणाने बोलत नसलं तरी त्यांना कमी उंचीच्या मुली मिठी मारण्यासाठी आवडतात.  कारण त्यांच्यामते कमी उंचीच्या मुली खूप क्युट असतात. 


(Image credit- panda gossips)

कमी उंचीच्या मुलीला मिठी मारण्याचे फायदे

(image credit- naukari nama)

सर्वसाधारणपणे अनेक मुलांना त्यांच्या तुलनेत मुलगी जर उंचीने कमी असेल तर ते त्या मुलीला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. तुलनेने जास्त उंची असलेली मुलगी असेल तर त्यांना स्वतःला तिच्यासमोर कमी असल्यासारखं वाटतं. त्यात असुरक्षिततेची भावना वाटते.

(image credit-thought catlog)

जेव्हा मुलं उंचीने कमी असलेल्या मुलीला मिठी मारत असतात त्यावेळी मुली संपूर्णपणे त्यांच्यात सामावलेल्या असतात. मग मुलींना खूप सेफ असल्यासारखं वाटतं आपला पार्टनर आपल्याला कधीही सोडून जाणार नाही असं वाटतं. मुली आपल्या पार्टनरवर खूप विसंबून असतात. त्यांची हिच गोष्ट मुलांना खूप आवडत असते. 

(image credit- romance scams)

कमी उंचीच्या मुलीला मिठी मारण्यासाठी खूप रोमँटिक वाटत असतं. रिलेशनशीपसाठी सुद्धा चांगलं असतं. कमी उंचीच्या मुली जास्त उंची असलेल्या मुलींच्या तुलनेत जास्त फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे मुलं  पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी हग करू शकतात आणि सहज अडजस्ट होत असलेल्या होतात. कारण अनेक कमी उंचीच्या मुली खूप चुळबुळीत  असतात.

(image credit- economics t)

कमी हाईट असलेल्या मुलींकडे मुलांना आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते.  म्हणून  अशा मुली लक्ष वेधून घेतात. जर्मनीतील एका रिसर्चनुसार कमी उंचीच्या मुलींमध्ये फेमिनिझम जास्त असतो. खूप लाजाळू  असतात. त्यांना मुलांसोबत रोमँन्टिक गप्पा मारायला खूप आवडत असतं. ( हे पण वाचा-लग्न झाल्यानंतर 'या' चुका कराल, तर पार्टनर कधी सोडून जाईल कळणार सुद्धा नाही!)

(Image credit-listusrge)

कमी उंचीच्या मुली आपल्या मनातील गोष्टी सहजगत्या शेअर करतात. म्हणून मुलांना  असं वाटत असतं की या मुली नेहमी त्यांच्या सोबत राहतील. कमी उंचीच्या मुलींना मिठी मारत असताना त्यांना सोप्या पद्धतीने मस्ती करता येते. त्यांना किस सुद्धा करता येतं. त्यामुळे नातं अधिक घट्ट् होत जातं. ( हे पण वाचा-ना पैसा ना प्रॉपर्टी 'या' गोष्टींनी तुमचा पार्टनर तुमच्यासाठी ठरेल मिस्टर परफेक्ट!)

Web Title: Why do boys like to hug girls with shirt girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.