(Image Credit : www.businessinsider.in)
प्रेम आणि रिलेशनशिपबाबत रोज वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तरूणींना पहिल्या डेटला तरूणांकडून काय अपेक्षा असते? याबाबत जाणून घेण्यात आले. पहिल्यांदा एखाद्या मुलीसोबत डेटला जाताना मुलांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, मुलींना पहिल्या डेटला काय आवडेल? तर या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, मुली त्यांच्या पहिल्या डेटला फार सावध राहतात.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, मुलींना त्यांच्या पहिल्या डेटला सहजता हवी असते. त्यांना वाटत असतं की, पहिल्या डेटला ज्याच्यासोबत त्या जात आहेत, त्याच्यासोबत त्यांना चांगलं वाटावं. एका डेटिंग साइटने हा रिसर्च केला असून त्यांनी ५ हजार सिंगल लोकांसोबत पहिल्या डेटबाबत चर्चा केली. हे सगळे लोक वेगवेगळ्या समुदायातील आणि आर्थिक पार्श्वभूमीतील होते.
रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, ७९ टक्के मुलींना पहिल्या डेटला कंफर्टेबल वाटावं अशी इच्छा असते. त्यासोबतच त्यांना वाटत असतं की, पहिल्या डेटला मुलाने त्यांचं बिल भरावं आणि डेटिंग प्लेसला मुलाने त्यांच्याआधी पोहोचावं. तसेच मुलाने डेटिंग प्लेसला आधी पोहोचाव आणि त्या आल्यावर त्यांना मिठी मारावी.
सामान्यपणे मुलीही पहिल्या डेटला तेवढ्याच संभ्रमात असतात जेवढे मुलं असतात. दोघांच्याही मनात अनेक प्रश्न पडलेले असतात. अशात मुलींना सहजता हवी असते, जेणेकरून त्या मुलासोबत मोकळेपणाने बोलू शकतील.