दोन मिनिटात साकरतो व्यक्तीचित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:22 IST2016-02-28T12:22:18+5:302016-02-28T05:22:18+5:30

व्यक्तीचित्र साकारणे हे फार कठीण काम आहे. व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाची झलक त्या चित्रातून व्हावी अशी अट व्यक्तिचित्राची असते त्यामुळेच हे चित्र साकारण्यासाठी कित्येक तास लागतात. 

Two minute snapshot persona | दोन मिनिटात साकरतो व्यक्तीचित्र

दोन मिनिटात साकरतो व्यक्तीचित्र

ong>व्यक्तीचित्र साकारणे हे फार कठीण काम आहे. व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाची झलक त्या चित्रातून व्हावी अशी अट व्यक्तिचित्राची असते त्यामुळेच हे चित्र साकारण्यासाठी कित्येक तास लागतात.

मात्र जर तुम्ही एखाद्या चित्रकाराने केवळ दोन मिनिटात तुमचे चित्र रेखाटण्याचा दावा केला तर तुम्ही विश्वास करणार नाही. मात्र ही किमया डी. वेस्ट्री या चित्रकाराने साकारली आहे. डी. वेस्ट्री हा स्वत:ला स्पीड पेंटर म्हणतो. तो अवघ्या दोनच मिनिटात इतके प्रभावी व्यक्तिचित्र काढतो की पाहणारा केवळ दंग राहतो.

त्याच्या व्यक्तिचित्रामध्ये संमोहित करून टाकण्याची शक्ती आहे. व्यक्तिचित्र काढण्याचा व्हिडिओ अ‍ँडरसन या युट्युब चॅनेलवर टाकण्यात आला आहे. जेव्हा तो चित्र काढतो तेव्हा तो काही रेषा मारत आहे असेच वाटते परंतु जेव्हा तो त्या चित्राला कलात्मक कलाटणी देतो तेव्हा ते चित्र पूर्ण होते.

Web Title: Two minute snapshot persona