क्लोज बॉडींग म्हटलं तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं ,नवरा बायकोचं नातं डोळ्यासमोर येतं. कारण सुखदुखात एकमेकांची साथ देण्यासोबतच आपल्या मनातील गोष्टी शेअरींग करणं हे कपल्समध्ये होतंच असतं. एकमेकांबाबत लहान लहान गोष्टी माहीत असतानाही काही गोष्टी शेअर करण्याबाबत पतीला कंफर्टेबल वाटतं नाही. काही अशा गोष्टी ज्याबाबत  पत्नीला सांगायचं की नाही. असा विचार पुरूष करतात. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 बँक बॅलेन्स

NBT

खरं पाहायला गेलं तर 'मनी मॅटरर्स' असं म्हणतात. अनेक घरांमध्ये पैश्यांबाबातचे व्यवहार पत्नीकडून केले जातात. पण  पुरूषांना आपल्या इन्वेस्टमेंटबाबत गुप्तता पाळायला आवडते. याबाबतीत अनेक पुरूष महिलांशी जास्त शेअर करत नाहीत कारण त्यांना खर्च केलेल्या पैशांबाबत सगळा हिशेब पत्नीला द्यावा लागतो. काहीवेळा यांमुळे पुरूष वैतागतात.

मित्रांसोबत फिरायला जाणं

पुरूषांना आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायला, नाईट आऊट करायला खूप आवडतं. अनेक पुरूष ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचे पत्नीला सांगून आपल्या मित्रांसोबत वेळ घालवतात. कारण फ्रेंन्ड्ससोबत असताना त्यांना मन मोकळं करता येतं. अशात पत्नीचा सतत फोन येत असेल आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी पत्नी विरोध करत असेल तर पुरूषांना फ्रस्टेशन येतं त्यामुळे मित्रांसोबत कुठेही जायचं असेल तर पुरूष पत्नीला खरं सांगणं  टाळतात. 

पत्नीच्या सवयी

प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयीप्रमाणे आयुष्य जगत असतो. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कपल्सने कितीही एकमेकांशी जुळवून घेतले तरी पार्टनरच्या काही सवयी मात्र खटकत असतात. पण खुलेपणाने बोलल्याने अनेकदा वाद निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून सवयींबाबत समजवण्यापेक्षा पुरूष दुर्लक्ष करतात. 

फिमेल फ्रेंड

NBT

प्रत्येक पुरूषाला हे माहीत असतं की जर त्यांच्या ग्रुपमध्ये जर फिमेल फ्रेंड असेल तर पत्नीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणजेच अनसिक्योर वाटतं. त्यामुळे आपल्या मैत्रिणीबाबत काही सांगणं किंवा मैत्रिणीच्या भेटीबाबतच्या गोष्टी आपल्या पत्नीशी शेअर करताना पार्टनरला विचार करावा लागतो.

पार्टनरच्या आयुष्यात नक्कीच 'तो' किंवा 'ती' आहे; जर वागण्यात झाला असेल 'असा' बदल

पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

Web Title: Relationship tips Mararhi : Husband hesitate to tell these things to his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.