पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:09 PM2020-06-05T12:09:47+5:302020-06-05T12:10:28+5:30

अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

Trending arguments most married couples in india | पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

Next

कोणतंही नात भांडणाशिवाय टिकत नसतं. जिथे प्रेम आहे तिथे भांडणं सुद्धा होत असतात. पण एका मर्यादेपेक्षा जास्त वादाला तोंड फुटत गेलं की, पती पत्नीत भांडणं होतात. तसंच नातं तुटण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. एक्सपर्टच्यामते पती पत्नीच्या नात्यात भांडणं होणं हे खूपच सामन्य आहे. काही कॉमन कारणांवरून पती पत्नीत वाद होत असतात. या कारणांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

पत्नीला वेळ न देता फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं

अनेकदा पार्नटरला वेळ न देता मित्रांना वेळ दिल्यामुळे वाद होतात. कारण महिलांची नेहमी तक्रार असते की वेळ दिला जात नाही. पुरूषांना आपल्या मित्रांसह नाईटआऊटला वैगैर जायला खूप आवडतं. काहींना आपल्या पार्टनरला वेळ द्यायला फारसं आवडत नाही. त्यामुळेच वादाला तोंड फुटतं असतं. यासाठी पती पत्नींनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ,ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

आईच्या हाताचं जेवणं

भारतातील जास्तीत जास्त जोडप्याची भांडणं आईच्या आणि बायकोच्या जेवणाच्या चवीची तुलना केल्यामुळे होतात. यामुळे बायकोला दोन शब्द ऐकवले जातात. काही स्त्रियांना या  गोष्टीचा प्रचंड राग येतो. मग वादाला तोंड फुटतं. त्यामुळे भांडण टाळायची असतील तर जेवण कोणीही तयार केललं असू दे . आदर करायला शिका. तसंच तुलनात्मक न बोलता तुम्ही आपल्या पार्टनरला समजावून सांगू शकता. 

बदलती जीवनशैली

सोशल मिडियाच्या अति वापरामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे पती- पत्नीत भांडणं होतात.  मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवायला हवी.

मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

मुलींनी 'या' गोष्टींबाबत सागिंतलेलं खोटं; सगळ्याच मुलांना वाटतं खरं, कसं ते जाणून घ्या

Web Title: Trending arguments most married couples in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.