मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 04:41 PM2020-05-29T16:41:24+5:302020-05-29T16:57:04+5:30

मुलींकडेच तक्रारी असतात असं अजिबात  नाही. पुरूषांना सुद्धा आपल्या पार्टनरच्या सवयींचा सतत राग येतो.

5 habits of women which men absolutely hate in a relationship myb | मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

Next

 तुम्ही पाहिलं असेल की, अनेकदा मुली आपल्या बॉयफ्रेंडबाबत तक्रार करत असतात. मला त्याची ही गोष्ट आवडत नाही. हे पटत नाही, ते पटत नाही. आपल्या पार्टनरच्या चुकांची लांबलचक लिस्ट मुलींकडे असते. आपल्या पार्टनरबाबत मुली आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करतात. पण मुलींकडेच तक्रारी असतात असं अजिबात  नाही. पुरूषांना सुद्धा आपल्या पार्टनरच्या सवयींचा सतत राग येतो. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा काही सवयी सांगणार आहोत ज्यामुळे मुलांना खूप राग येतो. 

शॉपिंगसाठी फिरत राहणं

Related image

मुलांच्या तुलनेत मुलींची शॉपिंग करण्याची स्टाईल खूपच वेगळी असते. शॉपिंग करत असताना बरेच मुलं एखादी वस्तू आवडल्यानंतर पटकन विकत घेतात. पण हेच मुलांना ड्रेस पसंत करायला फार वेळ लागतो. आपल्या पार्टनरला स्वतःसोबत घेऊन अख्ख मार्केट फिरवतात. मुलांची इच्छा नसतानाही त्यांना मुलींसोबत फिराव लागतं. त्यामुळे मुलांना तुमचा राग येऊ शकतो.  म्हणून तुमच्या पार्टनरची इच्छा नसेल तर त्यांना शॉपिंगला घेऊन जाऊ नका. 

प्रश्न विचारणं

तु फोन  का नाही उचलला? इतका उशीर का झाला? रिप्लाय उशीरा का दिलास अशा प्रश्नामुळे पार्टनरला खूप इरिटेट होऊ शकतं. तुम्ही काळजीने एखादा प्रश्न विचारत असाल पण सतत असे प्रश्न केल्याने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

पर्सनल स्पेस न देणं

सगळ्याच मुलींना नात्यात पर्सनल स्पेस हवी असते. पण पार्टनरला स्पेस देण्याबाबत मुली नेहमी त्यांचा मान ठेवणं विसरतात. मोबाईल चेक करणं, मित्रमैत्रिणींमध्ये जाऊन अचानक प्लॅन ठरवणं.  हीच कृती मुलांनी केल्यास त्यांना दोषी ठरवलं जातं. त्यामुळे पार्टनरसोबत समजदारीने वागा. नाहीतर हेच ब्रेकअपचं कारण ठरू शकतं.  

लुक्सवरून प्रश्न विचारणे

अनेक मुलींना मी कशी दिसते, माझ्यातील बदल तू नोटीस केलेस का, मग माझा हेअर कट तुला आवडला नाही का?  असे प्रश्न तुम्ही पार्टनरला विचारत असाल तर आजचं असं करणं बंद करा. नाहीतर तुम्ही आपल्या पार्टनरची परिक्षा घेताय आणि चुकीचं उत्तर दिल्यानंतर तुम्ही रागवाल असं पार्टनरला वाटू शकतं. प्रत्येक मुलाची कौतुक करण्याची पद्धत वेगळी असू शकते. ही बाब तुम्ही लक्षात घ्यायला हवी. 

पार्टनरच्या चुकीच्या वागण्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे महिला सतत चिडचिड करतात

लॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...

Web Title: 5 habits of women which men absolutely hate in a relationship myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.