महिला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे  विचारात पडलेल्या असतात. लग्न झाल्यानंतर नातं टिकून राहण्यासाठी दोघांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे. आपण पार्टनरला समजून घेण्यापासून घरच्यांची मनं जपणं, मुलांचा विचार, ऑफिसचं काम अशा वेगवेगळ्या गोष्टींचं टेंशन महिलांना येत असतं.  

अनेकदा कारण नसताना महिला आपल्या पार्टनरशी शुल्लक गोष्टीवरून वाद घालत असतात. घरातील महिला जर खुश नसेल तर ते घर चांगलं राहत नाही. याऊलट महिला आनंदी असेल तर घरातील वातावरण सुद्धा चांगलं राहतं,  आज आम्ही तुम्हाला  महिलांच्या चिडचिड  करण्यामागे असलेल्या वेगवेगळ्या कारणांबाबत सांगणार आहोत.


राईचा पर्वत करणं

कोणत्याही कारणावरून पती- पत्नीमध्ये भांडण झालं तर नेहमी लवलकरात लवकर भांडणं कसं मिटवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण महिलांना लहानश्या गोष्टींचा इश्यू करून  दोन-तीन दिवस  वाद घालण्याची सवय असते.  त्यामुळे घरातील वातावरण चांगलं राहत नाही. इतकंच नाही काहीवेळा महिला कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीच नसतात. आपलं म्हणणं बरोबर आहे असं त्यांना वाटत असतं.

शॉपिंग करणं

शॉपिंग करणं सगळ्यात महिलांना आवडत असतं. प्रत्येकालाच आपल्या बजेटनुसार खरेदी करायला  आवडत असते. पण काही महिलांना पार्टनरकडून जरा जास्तचं  अपेक्षा असतात. त्यांना सतत नवनवीन गोष्टी स्वतःसाठी घ्यायला आवडतं. त्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात.  आर्थिकदृष्या समस्या निर्माण झाल्यामुळे वाद होतात.

जेलस फिल करणं

जेव्हा एखाद्या मैत्रिणीने कार किंवा कोणतीही वस्तू नवीन घेतल्यास अशा लहान मोठ्या गोष्टी, यांमुळे महिला जेलस फिल करतात. याचा राग मात्र पार्टनरवर काढला जातो.  अनेकांना सतत अपेक्षा ठेवण्याची सवय असते. या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर महिला अनेकदा मानसिक त्रास करून घेतात. सगळ्याच अपेक्षा पार्टनरकडून पूर्ण होतील असं नाही. त्यामुळे महिलांच्या भांडणाचं कारण अपेक्षा पूर्ण न होणे  हे सुद्धा असू शकतं.

Web Title: These habits of women can never make happier myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.