OMG : पुरुषांनी लग्नाअगोदरच पूर्ण कराव्यात ‘या’ अपेक्षा, अन्यथा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 06:30 AM2017-09-08T06:30:07+5:302017-09-08T12:00:07+5:30
पुरुषांनी आपली आवडती कामे लग्नाअगोदरच करून घ्यावीत, अन्यथा लग्नानंतर कदापी पूर्ण करु शकणार नाहीत. जाणून घेऊया कोणती कामे लग्नाअगोदर करुन घ्यावीत.
Next
ल ्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलते, हे आपण ऐकले असेलच. यावरुनच लग्न करणाराही पश्चाताप करतो आणि जो करत नाही तोदेखील पश्चाताप करतो असे म्हटले जाते. आणि ही म्हण पुरुषांच्या बाबतीत अगदी योग्य ठरते, कारण लग्नानंतर त्यांचे स्वातंत्र्य हिरावले जाते कारण त्याला प्रत्येक काम त्याच्या पत्नीच्या इशाऱ्यानेच करावे लागते. त्यासाठी पुरुषांनी आपली आवडती कामे लग्नाअगोदरच करून घ्यावीत, अन्यथा लग्नानंतर कदापी पूर्ण करु शकणार नाहीत. जाणून घेऊया कोणती कामे लग्नाअगोदर करुन घ्यावीत.
* आवडते गॅजेट
जर पुरुषाला महागडा फोन किंवा टॅब खरेदी करायचा असेल तर लग्नाअगोदरच खरेदी करुन घ्यावा, कारण लग्नानंतर बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात शिवाय पत्नी बजेटवर जास्त लक्ष देत असेल तर आपण महागडे फोन खरेदी करु शकत नाही.
* आवडते चित्रपट पाहणे
पुरुषांना जास्त अॅक्शन चित्रपट आवडतात मात्र लग्नानंतर त्याला आपल्या पत्नीच्या आवडीचे चित्रपट पाहावे लागतात. यासाठी लग्नाअगोदरच आपले आवडते चित्रपट पाहून घ्यावीत.
* मित्रांना भेटणे
शाळा आणि कॉलेजच्या वेळी झालेली मैत्री बऱ्याच बऱ्याचजणांच्या आयुष्यात कायम राहते. शिवाय मुलांचा अधिक वेळ मित्रांसोबतच व्यतित होत असतो मात्र लग्नानंतर बहुतांश महिलांना पुरुषांची ही सवय आवडत नाही. यासाठी मित्रांना कायमचे सोडण्याऐवजी नियोजन करा आणि जास्त वेळ पत्नीला द्या.
* स्वयंपाक घरातील काम
जेवण झाल्यानंतर मुले स्वत:च्या जेवणाची भांडे स्वयंपाक घरातही ठेवत नाहीत. लग्नाअगोदर ठिक आहे, मात्र लग्नानंतर असे केल्यास बॅड मॅनर्स गणले जाते. यासाठी स्वत:चे काम स्वत: करण्याची आणि स्वयंपाक घरात मदत करण्याची सवय लावून घ्या.