Ratnagiri Accident News: शिमगोत्सवासाठी जाताना अपघातात लांजातील तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:38 IST2026-03-03T11:38:30+5:302026-03-03T11:38:55+5:30

आंबडवे-लाेणंद महामार्गावर दुचाकीला अपघात

Youth from Lanj dies in accident while going to Shimgotsava | Ratnagiri Accident News: शिमगोत्सवासाठी जाताना अपघातात लांजातील तरुण ठार

Ratnagiri Accident News: शिमगोत्सवासाठी जाताना अपघातात लांजातील तरुण ठार

मंडणगड : शिमगाेत्सवासाठी आपल्या आठ मित्रांसाेबत पांगारी (ता. दापाेली) येथे दुचाकीने जाणाऱ्या तरुणाचा आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास टेम्पाे ट्रॅव्हलरने धडक दिल्याने अपघातातमृत्यू झाला. साहिल विजय बेंद्रे (वय २३, मूळ रा. खोचरे, ता. लांजा, सध्या राहणार घाटकोपर, मुंबई), असे मृताचे नाव आहे.

मूळचा लांजा तालुक्यातील असलेला साहिल आपल्या मित्रांसमवेत घाटकोपर येथून दुचाकीवरून दापोली येथे शिमगाेत्सवासाठी निघाला होता. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ-बौद्धवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. साहिल त्याच्या बाजूने दुचाकी चालवीत पुढे जात असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पाे ट्रॅव्हलरने दुचाकीला समोरून जोरदार धडक बसली.

या धडकेने साहिल आराम बसच्या चाकाखाली आला. त्याचवेळी त्याच्याबरोबर गाडीवरून प्रवास करणारा मित्र गाडीच्या धडकेने दूर फेकला गेल्याने जखमी झाला. मात्र, गाडीच्या चाकाखाली आलेल्या साहिलचा जागीच मृत्यू झाला. त्याला उपचाराकरिता भिंगळाेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते; पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेचे वृत्त कळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू हाेती. या अपघाताचा अधिक तपास मंडणगड पोलिस करत आहेत.

Web Title: Youth from Lanj dies in accident while going to Shimgotsava