योग हा मनावर ताबा मिळविण्यासाठी केलेली साधना : दिनेश पेडणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:15+5:302021-09-26T04:34:15+5:30

मंडणगड : योग हा मनावर ताबा मिळविण्यासाठी केली जाणारी एक साधना आहे. ती कोणत्याही धर्माची किवा पंथाची परंपरा नसून ...

Yoga is a sadhana done to control the mind: Dinesh Pednekar | योग हा मनावर ताबा मिळविण्यासाठी केलेली साधना : दिनेश पेडणेकर

योग हा मनावर ताबा मिळविण्यासाठी केलेली साधना : दिनेश पेडणेकर

मंडणगड : योग हा मनावर ताबा मिळविण्यासाठी केली जाणारी एक साधना आहे. ती कोणत्याही धर्माची किवा पंथाची परंपरा नसून वैज्ञानिक निकषावर आधारित असणारी एक जीवनशैली आहे, असे मत तळेघर येथील याेग शिक्षक दिनेश पेडणेकर यांनी व्यक्त केले.

गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सुशोभित भारत कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयमध्ये ‘योग व योगासने याचे दैनंदिन जीवनात महत्त्व’ कार्यक्रमाचे ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत हे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, विभागीय समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. शिरिफ काझी, सहायक प्रा. हनुमंत सुतार उपस्थित होते. प्रा. हनुमंत सुतार यांनी प्रास्ताविक केले.

दिनेश पेडेकर पुढे म्हणाले की, आपले मन व शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता योगाचे महत्त्व अनन्य आहे. योग जाणून, समजून घेऊन केल्यास त्याचे दूरगामी फायदे आहेत. आज योगाच्या अभावामुळे शरीर कमकुवत व व्याधीग्रस्त होत चालले आहे. यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाची विद्यार्थिनी योगिता पेडणेकर हिने याेगाची प्रात्यक्षिक करून दाखविली. आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. शरिफ काझी यांनी मानले.

Web Title: Yoga is a sadhana done to control the mind: Dinesh Pednekar