शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या रखवालदाराकडेच लाकूडसाठा

By admin | Updated: November 1, 2015 22:49 IST

चाफवली गाव : चौकशीच्या आदेशानंतर अवैध लाकूडसाठा अन्यत्र हलवला

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील पोलीसपाटलाच्या घराशेजारी तब्बल पाच महिने असलेला अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. रत्नागिरी - संगमेश्वरचे उपविभागीय अधिकारी यांनी देवरूख तहसीलदारांना याबाबत चौकशीचे आदेश देताच हा लाकूडसाठा काही दिवसांपूर्वी सलग तीन ते चार दिवस ट्रकद्वारे इतरत्र हलविण्यात आला आहे. मात्र, वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. चाफवली येथील पोलीसपाटील विजय चाळके यांच्याच घराशेजारी गेल्या पाच महिन्यांपासून सुमारे वीस ट्रक भरतील, एवढे लाकूड तोडून ठेवण्यात आले होते. चाफवली हे संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झाले असतानाही एवढी लाकूडतोड होऊनही वन विभागाला त्याची खबरही नव्हती. याबाबत चाफवलीतील ग्रामस्थ दीपक दळवी यांनी देवरूख तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार दिली होती. देवरूख येथील वन अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे रितसर निवेदनही देण्यात आल्यानंतर देवरूख वनपालांनी या जागेचा पंचनामाही केला होता. मात्र, याबाबतची पुढील कारवाई थंडावली होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी देवरूख तहसीलदारांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचे आदेश मिळताच संबंधितांचे धाबे दणाणले. त्यामुळे या जागेवरील लाकूडसाठा तीन ते चार दिवसांत इतरत्र हलविण्यात आला आहे. येथे असलेल्या लाकूडसाठ्याची दिवसाढवळ्या वाहतूक करताना वन विभागाचे डोळे बंद होते की काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रणा पोलीसपाटलाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही जनतेतून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)