चिपळुणात दुचाकीस्वाराने चाेरले महिलेच्या गळ्यातील दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:25+5:302021-08-24T04:36:25+5:30

चिपळूण : रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वाराने चोरल्याची घटना रविवारी तालुक्यातील धामपवणे खोतवाडी ते रावतळे मार्गावर घडली. ...

A woman riding a two-wheeler in Chiplun wore jewelery around her neck | चिपळुणात दुचाकीस्वाराने चाेरले महिलेच्या गळ्यातील दागिने

चिपळुणात दुचाकीस्वाराने चाेरले महिलेच्या गळ्यातील दागिने

चिपळूण : रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वाराने चोरल्याची घटना रविवारी तालुक्यातील धामपवणे खोतवाडी ते रावतळे मार्गावर घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कल्पना चंद्रकांत शेंबेकर (६१, रा. धामणवणे - खोतबाही) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्या रावतळे येथील बेडेकर यांच्या घरी चपाती - भाजी बनविण्यासाठी धामणवणे-खोतवाडी रस्ता ते रावतळे अशा जात होत्या. यावेळी धामणवणे रस्त्यावर दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागून येऊन थांबल्या व त्यांना घर कुठे आहे, असे विचारणा केली. त्यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एकाने अचानक शेंबेकर यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व पेन्डेंट जोरात ओढून जबरदस्तीने खेचून घेतले आणि ते दोघेही निघून गेले. या दागिन्याची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे. यावेळी शेंबेकर यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची माळ हातामध्येच धरून ठेवल्याने या माळेचा अंदाजे २ ग्रॅम वजनाचा तुकडा त्यांच्या हातामध्ये राहिला आहे. या प्रकारानंतर शेंबेकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A woman riding a two-wheeler in Chiplun wore jewelery around her neck