शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

खेडात आज जलचेतना परिषद

By admin | Updated: January 16, 2016 23:42 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : नव्या घोषणा होण्याची शक्यता?

खेड : खेड तालुक्यातील महाळुंगे येथे जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगबुडी नदीवरील जलोपासना अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता हा समारंभ होणार आहे. दरम्यान, जलपोसना अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कोकण हिताचे दृष्टीने काही नव्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान, जलबिरादरी महाराष्ट्र आणि सिंधुरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने संबंध कोकणात हा जलपरिक्रमेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ खेड येथील जगबुडी नदीठिकाणी करण्यात येणार आहे. जलक्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि मेगॅसेसे पुरस्कारप्राप्त डॉ़ राजेंद्रसिंह हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच पालकमंत्री रवींद्र वायकरही उपस्थित राहणार आहेत. डॉ़ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत जगबुडी नदीवर नेमके काय करणार, तसेच या जलअभियानामुळे कृषी क्षेत्रात किंवा पिण्याच्या पाण्याबाबत काय उपाययोजना होणार आहेत, याविषयी अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे़ महाळुंगे या गावात हे अभियान होत असल्याने या मार्गावर असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागाचा कायापालट होणार आहे़ या अभियानामुळे कोकणातील जलचेतना अभियान यशस्वी होण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच कृषी क्षेत्रात नवे पर्व यामुळे सुरू होणार आहे़ (प्रतिनिधी) ेकडेकोट सुरक्षा व्यवस्था दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरासह भरणे नाका आणि महाळुंगे दरम्यान १२ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गाच्या परिसरातही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे़