विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती

By Admin | Updated: January 30, 2015 23:12 IST2015-01-30T23:01:06+5:302015-01-30T23:12:14+5:30

१९८२ ते २००० पर्यंत ते लिपीक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना अव्वल कारकून म्हणून बढती मिळाली होती

Vivek Jangam is promoted as a nahab Tehsildar | विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती

विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती

चिपळूण : येथील तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती मिळाली असून, त्यांची गुहागर तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे.जंगम हे डिसेंबर १९८२ मध्ये लिपीक पदावर महसूल खात्यात मंडणगड तहसील कार्यालयात रुजू झाले होते. त्यांनी नैसर्गिक आपत्ती, आस्थापना, ग्रामपंचायत निवडणूक, फौजदारी बाबी या महत्त्वाच्या विषयांची हाताळणी अत्यंत दक्षपणे केली आहेत. १९८२ ते २००० पर्यंत ते लिपीक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना अव्वल कारकून म्हणून बढती मिळाली होती. यावेळी त्यांनी गुहागर तहसील कार्यालयात पुरवठा शाखा व संजय गांधी निराधार योजना विभागात सेवा बजावली. त्यानंतर चिपळूण तालुक्यात शिरगांव, मार्गताम्हाणे व चिपळूण शहरामध्ये मंडळ अधिकारी म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. महसूल विभागाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी राज्यस्तरावर चांगली कामगिरी केली आहे. नायब तहसीलदारपदी बढती मिळाल्याने त्यांचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील व कर्मचा
ऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. माहेश्वर मंडळाकडूनही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Vivek Jangam is promoted as a nahab Tehsildar