कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणार : हरिश्चंद्र लाेखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:38+5:302021-07-11T04:21:38+5:30

मंडणगड : कलावंतांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, त्यांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळवून देण्यासोबतच त्यांचे विविध प्रश्न, ...

Various questions of artists will be solved: Harishchandra Lakhande | कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणार : हरिश्चंद्र लाेखंडे

कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणार : हरिश्चंद्र लाेखंडे

मंडणगड : कलावंतांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, त्यांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळवून देण्यासोबतच त्यांचे विविध प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासठी कार्यतत्पर राहणार असल्याचे शाहीर हरिश्चंद्र उर्फ विश्वजित लोखंडे यांनी सांगितले. ते शहरातील कलाभवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शाहीर लोखंडे यांची रत्नागिरी जिल्हा शाहीर मानधन समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोककला मराठी शाहीर परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असताना आगामी काळातील कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, अनेक वर्षे मानधन समितीवर प्रतिनिधित्व नसल्याने खऱ्या कलावंतांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागले. त्यांना पुन्हा समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करताना यापुढे लोककला जोपासणाऱ्या, कलाकार, साहित्यिक यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शासन दरबारी शाहिरांचा आवाज म्हणून कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलाकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

तसेच लोककला मराठी शाहीर परिषदेचे प्रभारी अध्यक्ष अनंत केंद्रे यांनी विविध कारणांनी शिथिलता आलेल्या तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था आणून मराठी शाहीर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच लोखंडे यांची मानधन समितीवर निवड झाल्याने शाहिरांना हक्काचा माणूस मिळाला असल्याच्या भावना उपस्थित कलाकारांनी व्यक्त केल्या. यावेळी लोककला मराठी शाहीर परिषदेचे प्रभारी अध्यक्ष अनंत केंद्रे, सुधीर महाडिक, पांडुरंग बाईत, संतोष पार्टे, अरुण नाकती, संजय सुगदरे, प्रभाकर जाधव, शंकर धाडवे, दिनकर शिंदे, अनिल शिंदे, चंद्रकांत मळेकर, दिलीप यादव, सखाराम माळी, भगवान होडबे, भिकू येरवणकर, दीपक सोविलकर उपस्थित होते.

Web Title: Various questions of artists will be solved: Harishchandra Lakhande