शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी दोन खासगी कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ...

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १९ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. यामध्ये शासकीय कोविड केअर सेंटर १६, तर पेड कोविड केअर सेंटर ३ कार्यरत आहेत. पेड कोविड सेंटरमध्ये आणखी दोन सेंटरची नव्याने भर पडली आहे.

आतापर्यंत बेडची संख्या १३२० असून, आज ७२० कोविड रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

सध्या जिल्ह्यात चिपळूण येथे आयुसिद्धी आणि संजीवनी तसेच लांजातील छोटूभाई देसाई अशी तीन हाॅस्पिटल्स पेड कोविड केअर सेंटर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरीत मराठा रेसिडन्सी आणि कोहिनूर हाॅटेल ही दोन पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

कोविडची लक्षणे असणाऱ्या व्यक्‍तींना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते. त्यांची रोज दिवसातून तीन वेळा तापमान, ऑक्सिजन, रक्तदाब आदींची तपासणी केली जाते. या केअर सेंटरमध्ये ६ मिनिट वॉक टेस्ट दिवसातून दोनदा केली जाते. ६ मिनिट वॉक टेस्ट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे लवकर निदान होते.

लक्षणे असणाऱ्या व सौम्य लक्षणे व कोविड पॉझिटिव्ह व्यक्‍तींसाठी ६ मिनिट वॉक टेस्ट करावी. ज्या व्यक्तींचे वय ६० वर्षांखाली असेल तसेच ज्यांना कोमॉर्बिडिटी नाही व कोविड १९ची लक्षणे नाहीत; परंतु कोविडची तपासणी केल्यास पॉझिटिव्ह आली, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविकांमार्फत केली जाते. प्रत्येक कोविड व्यक्तींची ६ मिनिट वॉक टेस्ट केली जाते, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.