मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:21 IST2025-02-22T16:21:06+5:302025-02-22T16:21:26+5:30
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार ...

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला.
चालक मोहम्मद अत्तार समशेर अली शहा (२२, रा. नागनाथपूर, पकरपूर, सुलतानपूर, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर गुलाम मोहम्मद रज्जाक अली शहा (२१, रा. इब्रदीमपूर, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी चालक मोहम्मद अली शहा हा ट्रक (एमएच. ०४, एचडी. ८२९२) मधून लोखंडी सळ्या भरून गोवा ते मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ट्रक बावनदी पुलाच्या अलीकडील उतारातील वळणात आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक उलटला.
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघाताची माहिती तेथील पोलिस पाटील संजना पवार (४१, रा. निवळी, कोकजे वठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.