रत्नागिरीत रेल्वे रुळावर सापडले दोन मृतदेह, एकाची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:12 IST2025-05-02T17:12:24+5:302025-05-02T17:12:44+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील रेल्वे पूल तसेच आरटीओ ऑफिस समोरील रेल्वे रूळ याठिकाणी मृतदेह सापडले. हा प्रकार मंगळवारी ...

रत्नागिरीत रेल्वे रुळावर सापडले दोन मृतदेह, एकाची ओळख पटली
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील रेल्वे पूल तसेच आरटीओ ऑफिस समोरील रेल्वे रूळ याठिकाणी मृतदेह सापडले. हा प्रकार मंगळवारी उघडकीला आली. यातील आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव दत्ता बिरा यमगर (३४, मूळ रा. सांगोला, सोलापूर, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे आहे.
मंगळवारी रात्री रेल्वे पोलिसांना मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे पुलाजवळ तसेच आरटीओ कार्यालयाच्या समोरील रेल्वे रुळावर तरुणांचे मृतदेह दिसले. एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ सापडलेल्या मृतदेहाच्या शरीरावरून रेल्वे गेल्याने त्याचे शीर धडापासून वेगळे झाले होते. याबाबत रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
तसेच आरटीओ येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. दोन्ही पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचे पंचनामे करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.
या तरुणांनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत ग्रामीण व शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक कदम आणि शहर पोलिस स्थानकाचे हेेडकाॅन्स्टेबल गायकवाड करत आहेत.