मार्लेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात सुरुंग स्फोट; परिसरातील अंगण, बांधकामांना तडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:25 IST2026-01-09T18:24:39+5:302026-01-09T18:25:12+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र, हे स्फाेट अवैधरित्या करण्यात येत ...

Tunnel blast in riverbed near Marleshwar temple cracks in courtyards and structures in the area | मार्लेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात सुरुंग स्फोट; परिसरातील अंगण, बांधकामांना तडे 

मार्लेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात सुरुंग स्फोट; परिसरातील अंगण, बांधकामांना तडे 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र, हे स्फाेट अवैधरित्या करण्यात येत असल्याचा आराेप मारळ येथील ग्रामस्थांनी केला असून, या स्फाेटांना विरोध दर्शवला आहे. ठेकेदार व त्यांना सुरुंग स्फोटाची परवानगी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी व सुरुंग स्फोटाची साधने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत मारळ ग्रामस्थांनी देवरुख तहसीलदार व देवरुख पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. मार्लेश्वर देवस्थान येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पुलाचे काम सुरू आहे. हे काम करताना ठेकेदाराकडून नदीपात्रामध्ये सुरुंग लावले जात आहेत. आजपर्यंत ५० ते ६० सुरुंगाचे स्फोट करण्यात आले आहेत. मंदिराच्या पायथ्याशी होत असलेल्या सुरुंग स्फोटामुळे मंदिर परिसरातील अंगण व बांधकामांना तडे जात आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या स्फोटामुळे मंदिर परिसरामध्ये पर्वतावरील दगड खाली येण्याचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही सुरुंग लावण्याचे प्रकार थांबवले जात नाहीत. मंदिर परिसराच्या व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरुंग स्फोट थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title : मार्मलेश्वर मंदिर: खदान विस्फोटों से संरचनाओं को नुकसान, ग्रामीणों का विरोध।

Web Summary : मार्मलेश्वर मंदिर के पास नदी तल में अवैध खदान विस्फोटों का ग्रामीणों ने विरोध किया। उन्होंने घरों और मंदिर के आसपास नुकसान का आरोप लगाया। उन्होंने ठेकेदार के खिलाफ कार्रवाई और विस्फोटों को रोकने की मांग की।

Web Title : Marmaleshwar Temple: Quarry blasts damage structures, villagers protest illegal activity.

Web Summary : Villagers near Marmaleshwar temple protest illegal quarry blasts in the riverbed. They allege damage to homes and the temple vicinity. They demand action against the contractor and halting the blasts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.