जनावरांची वाहतूक; गाडी पकडली

By Admin | Updated: December 28, 2014 00:11 IST2014-12-28T00:10:12+5:302014-12-28T00:11:23+5:30

चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले

Transport of animals; Got the car | जनावरांची वाहतूक; गाडी पकडली

जनावरांची वाहतूक; गाडी पकडली

चिपळूण : गुहागर-चिपळूण रस्त्यावर एन्रॉन बायपासजवळ शुक्रवारी रात्री १० वाजता जनावरे वाहतूक करणारी युटीलिटी गाडी पकडण्यात आली.
चिपळूण परिसरात गेले काही दिवस जनावरांची वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या वेळी ही वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. शुक्रवारी रात्री एका युटीलिटीमधून १ गाय व ४ बैलांची वाहतूक केली जात होती. हे पोलिसांच्या निदर्शनास येताच पाठलाग करुन गाडी पकडण्यात आली. पाठलाग सुरु होताच गाडीतील चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. याप्रकरणी विजय बोरगावकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीत असणाऱ्या जनावरांची किंमत २६ हजार रुपये होती. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Transport of animals; Got the car