शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक काेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

चिपळूण : येथील बहादूरशेख नाक्यावरील चौकात चिपळूण - कऱ्हाड मार्गावर पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे ...

चिपळूण : येथील बहादूरशेख नाक्यावरील चौकात चिपळूण - कऱ्हाड मार्गावर पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे परिस्थितीत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. एखादा मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे.

शहरातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी महामार्ग विभागाने हा खड्डा खोदून ठेवला असल्याने नगर परिषदेचाही नाईलाज झाला आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, बहादूरशेख ते शिवाजीनगर या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम अगोदर करणे आवश्यक असल्याने ते कामही हाती घेण्यात आले आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांच्यामध्ये या विषयात समन्वय नसल्याने शहरातील नागरिक तसेच वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील पाणी पुरवठ्याचे तर तीनतेरा वाजलेच आहेत. पण बहादूरशेख नाका येथे चिपळूण - कऱ्हाड मार्गावर महत्त्वाच्या चौकात भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावरच हा खड्डा असल्याने महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे साहजिकच येथे वाहतूक कोंडी होऊन चौकात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या खड्ड्यामुळे येथील रिक्षा स्टॅण्डही हलविण्यात आल्याने वाहतुकीला अधिक अडथळा निर्माण झाला आहे. येथे अपघात झाल्यास त्याला महामार्ग विभागच जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी दिला आहे.