शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सौंदळ स्थानकामुळे पर्यटन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 00:31 IST

राजापूर तालुका : दिवाळीपूर्वी होणार भूमीपूजन

राजापूर : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी बहुचर्चित अशा राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याने कोकण रेल्वेच्या नकाशावर त्याची नोंद होणार आहे, तर खऱ्या अर्थाने बहुसंख्य तालुकावासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केवळ प्रवासी वाहतूक यादृष्टीने नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील भविष्यात हे स्थानक उपयुक्त ठरणार आहे.कोकणात रेल्वेचे आगमन झाल्याच्या घटनेला जवळपास दीड दशकाचा कालखंड लोटला. मात्र, विविध भागातील मोठ्या प्रमाणातील जनता आपल्या लगत एखादे स्थानक नसल्याने उपेक्षित राहात होती व तो अनुभव राजापूर तालुक्यातील जनतेने घेतला. अशा सौंदळ स्थानकाची निर्मिती करण्याबाबत मागील बावीस वर्षे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशपांडे यांनी सातत्याने उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर रेल्वे मंत्रालयाकडे सौंदळ स्थानकाचा पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तथापी एवढी वर्षे सातत्याने काही ना काही तांत्रिक त्रुटी काढीत वेळ मारून नेण्याचे काम कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी चालूच ठेवले होते. पण, आपल्या मागणीला सत्यात उतरविण्यासाठी अधीर झालेल्या देशपांडेंनी त्या अधिकाऱ्यांची डाळ शिजू दिली नाही. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सौंदळ स्थानकाला मान्यता द्यावीच लागली.सौंदळ या स्थानकासाठी २५ कोटीचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा होताच तालुक्याच्या पूर्व परिसरात जंगी स्वागत झाले. आता साधारणत: दसरा ते दिवाळी या दरम्यान सौंदळ स्थानकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तशी तयारी व बोलणी सुरु असल्याची माहिती सौंदळ रेल्वे स्थानक निर्मितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत देशपांडे यांनी दिली. राजापूर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच सौंदळ स्थानक उभारले जात आहे. मुंबई - गोवा महामार्गापासून ओणीतून आतमध्ये सुमारे ८ ते १० किलोमीटर एवढ्या अंतरावर, तर ओणी - अणुस्कुरा या मार्गाला खेटूनच ते असेल. त्यामुळे प्रवाशांना इथून प्रवास करताना अडचण येणार नाही. सध्याचे राजापूर रोड स्टेशन हे एका टोकाला असल्याने लगतच्या परिसरातील काही गावातील नागरिक वगळता कुणी तेथून प्रवास करायला धजावत नाही. रात्रीच्या जाणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांना जायचे असेल तर तेथे जाण्यासाठी एस. टी.ची सुविधा नाही. त्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागतो. रिक्षाचालक ३०० रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतात, असे आजवरचे चित्र राहिले आहे. त्यामुळे राजापूरवासीयांसह विविध भागातील प्रवाशांना सोयीचे ठरेल, अशा सौंदळ स्थानकाचा पर्याय मिळणार आहे. ओणी पट्ट्यातील तसेच पूर्व विभागातील प्रवासी लगतच्या लांजा तालुक्यातील विलवडे या स्थानकाचा आधार घेतात. तेथे फार मोठी गर्दी उसळते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील सर्व प्रवासी सौंदळचाच पर्याय निवडू शकतात. केवळ राजापूर तालुकाच नाही, तर लगतच्या अणुस्कुरा व त्याच्या आजूबाजूच्या प्रवाशांना रेल्वेसाठी थेट कोल्हापूर गाठावे लागते. त्यामुळे तिकडच्या प्रवाशांनादेखील सुलभ प्रवास करण्यासाठी हे स्थानक उपयुक्त ठरु शकणार आहे. (प्रतिनिधी)राजापूरकरांची होणार सोयपूर्वेकडे सह्याद्री, तर पश्चिमेला अरबी समुद्र अशा विस्तीर्ण पसरलेल्या राजापूर तालुक्याला विद्यमान क्षणी केवळ एकच रेल्वेस्थानक आहे व तेसुद्धा शहरापासून १८ ते २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलये गावी. त्या स्थानकाचा फायदा आजूबाजूच्या १५ ते २० गावांना सोडला, तर उर्वरित राजापूर तालुकावासीय हे विलवडे, रत्नागिरी अशा ठिकाणीच जाऊन रेल्वेने प्रवास करतात, हे मागील काही वर्षांचे चित्र आहे. त्यामुळे राजापूरकरांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल.